IPL 2021 : मुंबईला पोलार्डची एक चूक नडली, म्हणूनच चेन्नईने विजयाची साखर खाल्ली!

| Updated on: Sep 20, 2021 | 2:02 PM

मुंबईचा नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या मुंबईची धुरा किरन पोलार्डच्या खांद्यावर होती. त्याचीच एक चूक मुंबईच्या पराभवाला जबाबदार ठरली. पोलार्डने योग्य प्रकारे गोलंदाजांचा वापर केला नाही, अशी टीका पीटरसन आणि इरफानने सामन्यानंतर केली.

IPL 2021 : मुंबईला पोलार्डची एक चूक नडली, म्हणूनच चेन्नईने विजयाची साखर खाल्ली!
Kieron Pollard
Follow us on

मुंबई :  चेन्नईने आयपीएलच्या 14 व्या पर्वातील दुसऱ्या टप्प्यात दमदार सुरुवात केली. पहिल्याच सामन्यात चेन्नईने गतविजेत्या मुंबईचा 20 धावांनी पराभव करुन अंकतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली. मुंबईचा नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या मुंबईची धुरा किरन पोलार्डच्या खांद्यावर होती. त्याचीच एक चूक मुंबईच्या पराभवाला जबाबदार ठरली. पोलार्डने योग्य प्रकारे गोलंदाजांचा वापर केला नाही, अशी टीका पीटरसन आणि इरफानने सामन्यानंतर केली.

पीटरसन-इरफानच्या पोलार्ड निशाण्यावर!

चेन्नईचा संघ अतिशय वाईट अवस्थेत असताना महाराष्ट्राचा सुपुत्र ऋतुराज गायकवाडने चेन्नईसाठी बहादरखेळी खेळी केली. पण एकवेळ सामन्यात अशी स्थिती आली होती की चेन्नई 100 धावाही पार करतीय की नाही, अशी शंका होती. परंतु ऋतुराजने शेवटपर्यंत खेळपट्टीवर उभा राहून चेन्नईच्या डावाला आकार दिला. त्याला ब्राव्होने सुंदर साथ दिली. 4 बाद 24 धावसंख्येवरुन चेन्नईने 156 धावांची सन्मानजनक धावसंख्या उभारली. दरम्यान, सामन्यात मुंबईचं पारडं जड असताना अशी कोणती वेळ आली की चेन्नईने सामन्यात पुनरागमन केलं, असा प्रश्न अनेकांना पडला. पण याच प्रश्नाचं उत्तर सामन्याचे कॉमेंटेटर केवीन पिटरसन आणि इरफान पठाण यांनी दिलं. रोहित शर्माच्या अनुपस्थितीमुळे किरन पोलार्डच्या खांद्यावर मुंबईच्या कर्णधारपदाची जबाबदारी होती. पोलार्डने सुयोग्यरित्या गोलंदाजांचा वापर न केल्याने चेन्नई 156 धावा करु शकली. शेवटी मुंबईचा पराभव झाला, अशी टीका पीटरसन आणि इरफानने पोलार्डवर केली.

माशी नेमकी कुठे शिंकली, पोलार्डचं कुठे चुकलं?

स्टार स्पोर्ट्सच्या कॉमेंट्री पॅनलमध्ये समाविष्ट असलेल्या दिग्गजांनी पोलार्डच्या कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित केले. केविन पीटरसन आणि इरफान पठाण यांनी पोलार्डवर निशाणा साधला. दोघांनीही पोलार्डच्या कर्णधारपदाला मुंबईच्या पराभवाला जबाबदार धरले. विशेषतः पोलार्डने मधल्या षटकात जसप्रीत बुमराहचा योग्य वापर करू शकला नाही. या कारणास्तव, 24 धावांवर 4 गडी गमावूनही चेन्नईला 156 धावा करता आल्या, असं ते म्हणाले.

पीटरसन म्हणाला की, मोईन अली, फाफ डु प्लेसिस, कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना लवकर बाद झाले. अशा स्थितीत चेन्नईचा संघ लवकर ऑलआऊट करण्याची मुंबईकडे संधी होती. पण पोलार्डने बुमराहचा योग्य वापर केला नाही आणि मधल्या षटकांमध्ये कृणाल पंड्याला चेंडू दिला. त्याने चेन्नईच्या डावातील 10 वी आणि 12 वी ओव्हर टाकली. त्याच्या पहिल्या षटकात फक्त 9 धावा आल्या. पण दुसऱ्या षटकात ऋतुराज गायकवाड आणि जाडेजाने 18 धावा ठोकल्या. कृणालच्या या षटकात 2 चौकार आणि 1 षटकार लगावला. कृणालने 13 पेक्षा जास्त सरासरीने 2 षटकांत 27 धावा दिल्या.

(IPL 2021 Mi vs CSK Kieron Pollard did not use the bowlers properly Says kevin pietersen irfan pathan)

हे ही वाचा :

या 2 खेळाडूंमुळे मुंबईचा पराभव करु शकलो, विजयानंतर MS धोनीची प्रतिक्रिया

IPL 2021: विराटचा आणखी एक मोठा निर्णय, यंदाच्या आयपीएलनंतर आरसीबीचं कर्णधारपदही सोडणार

IPL 2021: मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग सामन्यात रोहित का नाही?, पोलार्डने सांगितलं कारण

PHOTO: IPL मध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारे फलंदाज, एका दिग्गज कर्णधाराचाही समावेश