अबू धाबी : मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) शुक्रवारी त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात मोठ्या विजयाची गरज होती. मोठा विजय मिळावा यासाठी त्यांनी सर्वकाही केले. कर्णधार रोहित शर्माने त्यांचा लेगस्पिनर गोलंदाज पियुष चावलाला (Piyush Chawla) संपूर्ण हंगामात बेंचवर बसवून ठेवलं होतं, मात्र शेवटच्या आणि महत्त्वाच्या सामन्यात त्याला संधी दिली. पियुषचा मुंबईसाठी हा पहिलाच सामना होता आणि त्याने या सामन्यात मोठा विक्रम केला. (IPL 2021: Piyush Chawla Sets Record For Highest Wickets By An Indian In T20s During MI vs SRH)
यापूर्वी पियुष चेन्नईकडून खेळत होता. पियुष चावला, जो 2020 च्या लिलावात सर्वात महागडा भारतीय खेळाडू (6.75 कोटी) होता, त्याला चेन्नईने लिलावापूर्वी संघातून मुक्त केले. पियुष यूएईमध्ये खेळवण्यात आलेल्या गेल्या मोसमात सात सामने खेळला आणि त्यात फक्त सहा विकेट्स घेऊ शकला. या 32 वर्षीय लेग स्पिनरची यावेळी त्याची मूळ किंमत 50 लाख होती. त्याला संघात घेण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये स्पर्धा होती. तथापि, अखेरीस, मुंबईने 2.40 कोटी रुपयांत त्याला खरेदी केले. संघाने त्याला संपूर्ण हंगामात खेळण्याची संधी दिली नाही. त्याला शेवटच्या सामन्यात मुंबईकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याने या सामन्यात फक्त एक विकेट घेतली पण त्याच विकेटमुळे तो भारताचा टी – 20 मधील सर्वात यशस्वी गोलंदाज बनला.
मुंबईसाठी लीगमध्ये पदार्पण करणाऱ्या पियुष चावलाने नवव्या षटकात मोहम्मद नबीला बाद केले. नबी पियुषच्या चेंडूवर कायरन पोलार्डकडे झेल देत बाद झाला. या विकेटसह पियुषने टी 20 मध्ये 263 विकेट्स पूर्ण केल्या आणि या फॉरमॅटमध्ये तो भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला. पियुषने आपल्या 249 व्या टी -20 सामन्यात हे लक्ष्य साध्य केले. यापूर्वी हा विक्रम अमित मिश्राच्या नावावर होता त्याने 236 सामन्यांमध्ये 262 विकेट्स घेतल्या आहेत. पियुष चावला आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा चौथा खेळाडू आहे. पियुष चावलाने 165 आयपीएल सामन्यांमध्ये 157 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर अमित मिश्राने 157 सामन्यात 166 विकेट्स घेतल्या आहेत आणि या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.
आयपीएलच्या साखळी फेरीतील आपल्या अखेरच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादवर 42 धावांनी मात करत मुंबईने स्पर्धेचा शेवट गोड केला आहे. अबू धाबीच्या शेख जायद आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या स्पर्धेतील 55 व्या सामन्यात मुंबईने मोठा विजय मिळवला आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबईने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय मुंबईचा सलामीवीर इशान किशनने सार्थ ठरवला. त्याने पहिल्या चेंडूपासून हैदराबादच्या गोलंदाजांवर तुफान हल्ला चढवला. इशान किशनच्या 84 आणि सूर्यकुमार यादवच्या 82 धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 235 धावांचा डोंगर उभा केला होता. त्या प्रत्युत्तरात खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांना निर्धारित 20 षटकात 193 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे मुंबईने या सामन्यात 42 धावांनी मोठा विजय मिळवला आहे. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत 14 गुण मिळवले आहेत. मात्र मुंबईचा नेट रनरेट कोलकात्यापेक्षा कमी असल्यामुळे मुंबईचा संघ प्ले ऑफसाठी क्वालिफाय होऊ शकला नाही. मुंबईचा नेट रनरेट 0.12 आहे तर कोलकात्याचा नेट रनरेट 0.58 इतका आहे.
इतर बातम्या
IPL 2021: इशान-सूर्यकुमारच्या धुवांधार फलंदाजीने रेकॉर्ड्सचा पाऊस, एकाच सामन्यात रचले अनेक विक्रम
T20 World Cup : जोर न लावताच भारत पाकिस्तानला नमवेल, माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूकडून संघाची कानउघडणी
(IPL 2021 : Vira
(IPL 2021: Piyush Chawla Sets Record For Highest Wickets By An Indian In T20s During MI vs SRH)