प्लेऑमध्ये बंगळुरुचा पराभव का झाला? विराटचं स्वप्न कसं भंगलं? या 4 चुका झाल्याने पहिल्या ट्रॉफीला हुलकावणी
आरसीबीने संपूर्ण लीग फेरीत उत्तम खेळ दाखवला पण सोमवारी लीग स्पर्धेतील फॉर्म कायम ठेवण्यात आरसीबीला अपयश आलं. खेळाडूंच्या काही चुका संघाला खूपच महागात पडल्या.
1 / 5
ओयन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील केकेआरने प्लेऑफच्या सामन्यात आरसीबीचा पराभव करत दुसऱ्या पात्रता फेरीत स्थान पक्के केले. कोलकात्याने आरसीबीला केवळ 138 धावांवर रोखलं आणि त्यानंतर, दोन चेंडू आणि चार विकेट शिल्लक असताना विजयही मिळविला. आता दुसऱ्या क्वालिफायरमध्ये कोलकात्याचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होईल. आरसीबीने संपूर्ण लीग फेरीत उत्तम खेळ दाखवला पण सोमवारी लीग स्पर्धेतील फॉर्म कायम ठेवण्यात आरसीबीला अपयश आलं. खेळाडूंच्या काही चुका संघाला खूपच महागात पडल्या.
2 / 5
विराट कोहलीने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्याच्या अंगलट आला. त्याला वाटलं की खेळपट्टी हार्ड आहे आणि सामन्याच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करणे कठीण होईल. मात्र, घडलं ते उलटंच. नाणेफेक गमावल्यानंतरही आम्हाला धावांचा पाठलागच करायचा होता, असं वक्तव्य करुन मॉर्गनने विराटला काही क्षण बुचकाळ्यात टाकलं. धावांचा पाठलाग करताना अनेक संघ विजय मिळवत असल्याचंही काही सामन्यांमध्ये दिसून आलंय. अशा परिस्थितीत कोहलीने आधी गोलंदाजी करणं अधिक फायद्याचं ठरलं असतं.
3 / 5
सुनीर नरेनने या सामन्यात अष्टपैलू खेळ दाखवला, ज्यामुळे विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि ग्लेन मॅक्सवेलला सेट होण्याची संधी मिळाली नाही. अर्थात त्याचमुळे संघ मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. नरेनने 4 षटकांत 21 धावा देऊन 4 बळी घेतले. त्यानंतर त्याने फलंदाजीमध्येही चमत्कार केला. त्याने 15 चेंडूत 26 धावांच्या डावात तीन षटकार ठोकले, ज्यामुळे तो बाद झाल्यानंतरही संघावर दबाव आला नाही.
4 / 5
आरसीबीने गोलंदाजी करताना दोन महत्त्वाचे झेल सोडले ज्यामुळे त्यांचा सामन्यात पुनरागमन करण्याचा मार्ग जरासा अवघड झाला. नवव्या षटकात अहमद शहजादने मॅक्सवेलच्या पहिल्याच चेंडूवर व्यंकटेश अय्यरचा झेल सोडला. 17 व्या षटकात पडिकलने सुनील नरेनचा झेल सोडला. पाठोपाठ दोन विकेट्स घेऊन आरसीबी या सामन्यात पुनरागमन करु शकला असता. मात्र तसं झालं नाही.
5 / 5
विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी आरसीबीला झटपट सुरुवात करुन दिली. दोघांनी पाच षटकांत 49 धावा केल्या होत्या. पण त्यानंतर संघाला त्याचा फायदा उठवता आला नाही. सलामीची जोडी वगळता एकही फलंदाज 20 आकडाही पार करू शकला नाही. एबी डिव्हिलियर्स व्यतिरिक्त, शेवटच्या सामन्यातील मॅच विनर खेळाडू श्रीकर भारत आणि शाहबाज अहमदही चमकदार कामगिरी करु शकले नाहीत, ज्यामुळे संघ 20 षटकांत फक्त 138 धावा करू शकला.