DC vs RCB : चुरशीच्या सामन्यात अखेरच्या चेंडूवर भरतचा षटकार, विराटच्या ड्रेसिंग रुममध्ये उड्या, पाहा VIDEO

| Updated on: Oct 09, 2021 | 12:26 PM

आयपीएलच्या (IPL 2021) यंदाच्या पर्वातील 56 वा सामना विराट कोहलीच्या रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्स या संघामध्ये पार पडला. दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर झालेल्या या सामन्यात दोन्ही संघानी अतिशय उत्तम खेळाचे दर्शन घडवले.

DC vs RCB : चुरशीच्या सामन्यात अखेरच्या चेंडूवर भरतचा षटकार, विराटच्या ड्रेसिंग रुममध्ये उड्या, पाहा VIDEO
Virat Kohli
Follow us on

दुबई : आयपीएलच्या (IPL 2021) यंदाच्या पर्वातील 56 वा सामना विराट कोहलीच्या रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्स या संघामध्ये पार पडला. दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर झालेल्या या सामन्यात दोन्ही संघानी अतिशय उत्तम खेळाचे दर्शन घडवले. अखेरच्या चेंडूपर्यंत गेलेल्या या सामन्यात आरसीबीचा फलंदाज केएस भरत (K S Bharat) याने संघाला अखेरच्या चेंडूवर 5 धावांची गरज असताना षटकार ठोकत विजय मिळवून दिला. (IPL 2021 : Virat Kohli’s celebration after KS Bharat hits last-ball six to help RCB beat DC)

आरसीबीला मिळालेल्या रोमांचक विजयानंतर कर्णधार विराट कोहलीच्या आनंदाला थारा उरला नव्हता. त्याने ड्रेसिंग रूममध्ये विजयाचा जबरदस्त आनंद साजरा केला. श्रीकरने षटकार लगावताच विराटने ड्रेसिंग रूममध्येच उड्या मारण्यास सुरुवात केली. विराटचा सेलिब्रेशन करतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आरसीबी आणि दिल्ली हे दोघेही याआधीच प्लेऑफमध्ये गेले असल्याने शुक्रवारची लढत स्पर्धेच्या दृष्टीने औपचारिक होती. पण दोन्ही संघ उत्तम फॉर्ममध्ये असल्याने लढत चुरशीची झाली. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 164 धावा केल्या. 165 धावांचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी आरसीबीलाही संपूर्ण 20 षटकं खेळावी लागली, पण अखेर लक्ष्य पूर्ण करत आरसीबीने विजय मिळवला.

दिल्लीची दमदार सलामी

सामन्यात नाणेफेक जिंकत आरसीबीने गोलंदाजी निवडली. त्यामुळे फलंदाजी दिल्लीकडे गेली. ज्याचा दिल्लीच्या सलामीवीरांनी संपूर्ण फायदा उचलला. दिल्लीची हीट जोडी पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी दमदार फलंदाजी केली. सलामीवीर शिखरने 43 आणि पृथ्वीने 48 धावा केल्या. ज्यामुळे दिल्लीला एक चांगली सुरुवात मिळाली. ज्यानंतर शिमरॉन हीटमायरच्या 29 धावांच्या जोरावर दिल्लीने 164 धावांपर्यंत मजल मारली. आरसीबीकडून सिराजने 2 आणि चहल, पटेलसह ख्रिस्टीयनने प्रत्येकी 1 विकेट घेतला.

भरत-मॅक्सवेल जोडीची भागिदारी आणि आरसीबी विजयी

विजयासाठी 165 धावा करण्याकरता मैदानात आलेल्या आरसीबीचे सलामीवीर विराट आणि देवदत्त लगेच बाद झाले. एबीही 29 धावा करुन तंबूत परतला. पण त्यानंतर मैदानात आलेल्या केएस भरत आणि ग्ले मॅक्सवेल जोडीने अखेरच्या चेंडूपर्यंत लढत देत संघाला विजय मिळवून दिला. भरतने नाबाद 78 आणि मॅक्सेवेलने नाबाद 51 धावांची तुफानी खेळी केली. विशेष म्हणजे अखेरच्या चेंडूवर पाच धावांची गरज असताना आरसीबीच्या केेएस भरत याने षटकार ठोकत संघाला 7 विकेट्सनी विजय मिळवून दिला.

इतर बातम्या

IPL 2021: इशान-सूर्यकुमारच्या धुवांधार फलंदाजीने रेकॉर्ड्सचा पाऊस, एकाच सामन्यात रचले अनेक विक्रम

IPL 2021 : 5 वेळा विजयी, मग यंदा प्ले ऑफमध्ये एन्ट्री का नाही?, रोहित शर्मा म्हणतो, ‘कुणीच दोषी नाही फक्त…’

T20 World Cup : जोर न लावताच भारत पाकिस्तानला नमवेल, माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूकडून संघाची कानउघडणी

(IPL 2021 : Virat Kohli’s celebration after KS Bharat hits last-ball six to help RCB beat DC)