मुंबई: केएल राहुलने (KL Rahul) मागच्या सामन्यात शतक झळकावलं होतं. त्यामुळे RCB विरुद्धच्या सामन्यातही त्याच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा होती. पण असं घडलं नाही. केएल राहुल 30 धावांवर आऊट झाला. राहुल चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. त्याने तीन चौकार आणि एक षटकार लगावला होता. हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर लेग साइडच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर राहुलने फ्लिक करण्याचा प्रयत्न केला. चेंडूने हलकीशी बॅटची कड घेतली व विकेटकिपर दिनेश कार्तिकच्या (Dinesh Karthik) ग्लोव्हजमध्ये विसावला. राहुलचा विकेट गेल्याचं आधी लक्षातच आलं नाही. पण DRS कॉल यशस्वी ठरला. अंपायर्सनी राहुलला बाद ठरवलं. राहुल बाद झाल्यानंतर विराट कोहलीने खूप आक्रमक पद्धतीने सेलिब्रेशन केलं. राहुल पॅव्हेलियनमध्ये परतत असताना, कॅमेरा लगेच अथिया शेट्टीकडे फिरला. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती.
विराट कोहलीची अति आक्रमकता आणि अथिया शेट्टीचा निराश झालेला चेहरा याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. केएल राहुलला आधी पंचांनी नॉटआऊट ठरवलं होतं. पण दिनेश कार्तिकच्या सांगण्यावरुन कॅप्टन डु प्लेसिसने डिआरएसचा कॉल घेतला. त्यात केएल राहुल आऊट होता. हा विकेट मिळाल्यानंतर आरसीबीच्या खेळाडूंनी मैदानावर सेलिब्रेशन केलं. विराट कोहली या मॅचमध्ये स्वत: शुन्यावर आऊट झाला. पण सेलिब्रेशन करताना तो सगळ्यांच्याच पुढे होता. दुष्मंथा चमीराने विराटला पहिल्या चेंडूवर आऊट केलं. त्यावेळी कॅप्टन केएल राहुलही आनंदात दिसला होता.
— Peep (@Peep_at_me) April 19, 2022
केएल राहुल बाद झाल्यानंतर लखनौची टीम भरकटली. 182 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांनी निर्धारीत 20 षटकात 163 धावा केल्या. कृणाल पंड्याने 28 चेंडूत 42 धावा करुन चांगला प्रयत्न केला. पण आरसीबीचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड लखनौवर भारी पडला. जोश हेझलवूडने शानदार गोलंदाजी केली. त्याने चार षटकात 25 धावा देऊन चार विकेट घेतल्या.