IPL 2022: शाहिन आफ्रिदीला IPL मध्ये 200 कोटी मिळाले असते, पाकिस्तानी पत्रकाराच्या मूर्खपणावर तुटून पडले नेटीझन्स

| Updated on: Feb 16, 2022 | 6:36 PM

IPL 2022 Auction : इंडियन प्रिमियर लीग (IPL) आज क्रिकेट जगतातील सर्वात मोठी फ्रेंचायजी स्थित टी-20 लीग क्रिकेट स्पर्धा आहे. या लीगमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूंवर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जातो.

IPL 2022: शाहिन आफ्रिदीला IPL मध्ये 200 कोटी मिळाले असते, पाकिस्तानी पत्रकाराच्या मूर्खपणावर तुटून पडले नेटीझन्स
(AP Photo)
Follow us on

IPL 2022 Auction : इंडियन प्रिमियर लीग (IPL) आज क्रिकेट जगतातील सर्वात मोठी फ्रेंचायजी स्थित टी-20 लीग क्रिकेट स्पर्धा आहे. या लीगमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूंवर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जातो. IPL सारखीच ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, (West indies) श्रीलंका आणि बांगलादेश या देशांमध्ये टी-20 लीग क्रिकेट स्पर्धा होते. पण तिथे मिळणारे पैसे आणि IPL मधील मिळकत यामध्ये मोठा फरक आहे. आयपीएल इतका पैसा जगात दुसऱ्या कुठल्याच लीग स्पर्धेत मिळत नाही. पाकिस्तान सोडल्यास, जगातील सर्व देशातील क्रिकेटपटू या स्पर्धेत खेळतात. पाकिस्तानमध्ये गुणवान क्रिकेटपटूंची (Pakistan Cricket) कमी नाहीय. पण सीमेवरील तणाव आणि  खराब संबंधांमुळे IPL फ्रेंचायजी त्यांना विकत घेत नाहीत. त्यामुळे मागची काही वर्ष पाकिस्तानातील प्रतिभावान क्रिकेटपटू या स्पर्धेत खेळू शकलेले नाहीत. आयपीएलच्या उद्घाटनाच्या वर्षामध्ये शाहिद आफ्रिदी आणि शोएब अख्तर आयपीएल स्पर्धेमध्ये खेळले होते. पण त्यानंतर पाकिस्तानी क्रिकेटपटू आयपीएलमध्ये कधीही खेळताना दिसले नाहीत.

ट्रोलिंगला निमंत्रण दिलं

आयपीएल 2022 मेगा ऑक्शनमध्ये दहा संघांच्या फ्रेंचायजींमध्ये चांगल्या प्रतिभावान क्रिकेटपटुंसाठी बीडिंग वॉर पहायला मिळालं. चांगल्या क्रिकेटपटूंना विकत घेण्यासाठी फ्रेंचायजींनी पाण्यासारखा पैसा खर्च केला. या ऑक्शन संदर्भात एका पाकिस्तानी पत्रकाराने विचित्र दावा करुन ट्रोलिंगला निमंत्रण दिलंय. या पत्रकाराने शाहिन आफ्रिदी बाबत हा दावा केला आहे.

त्याला 200 कोटी रुपये मिळाले असते

शाहिन आफ्रिदी आयपीएल ऑक्शनचा भाग असता, तर त्याला 200 कोटी रुपये मिळाले असते, असं या पत्रकाराने म्हटलं आहे. शाहिन आफ्रिदी हा पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. या वक्तव्यानंतर पाकिस्तानी पत्रकाराची टि्वटरवर खिल्ली उडवली जातेय.


आयपीएलमध्ये खेळाडू विकत घेण्यासाठी एका टीमच बजेट 90 कोटी असतं, मग 200 कोटी कोण देणार? असा एका युजरने विचारलं आहे. दुसऱ्या एका युजरने तुमचं वार्षिक बजेट किती? असं म्हटलं आहे. मूर्खपणाची हद्दच झाली, एका युजरने म्हटलं आहे. बंगळुरमध्ये 12 आणि 13 फेब्रुवारीला आयपीएल ऑक्शन झालं.

IPL 2022 Auction Shaheen Afridi for Rs 200 crore Pakistan journalist trolled for tall claim on social media