बंगळुरु: भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाला IPL Mega Auction 2022 मध्ये कोणीही खरेदीदार मिळणार नाही असं दिसतय. दुसऱ्यादिवशी एक्सिलरेटेड राऊंडच्या बिडींग प्रोसेससाठी आयपीएल फ्रेंचायजींनी जी यादी दिली, त्यात सुरेश रैनाचं नाव नाहीय. ऑक्शनसाठी 600 खेळाडूंमध्ये सुरेश रैनाचीही (Suresh Raina) निवड झाली होती. काल जेव्हा त्याच्या नावाचा पुकार करण्यात आला, त्यावेळी कुठल्याही फ्रेंचायजीने त्याच्यासाठी बोली लावली नाही. मागची काही वर्ष सुरेश रैना सातत्याने CSK साठी खेळतोय. आक्रमक डावखुरा फलंदाज अशी सुरेश रैनाची ओळख आहे. वेगाने धाव करण्याचं कौशल्य त्याच्याकडे होतं. भारताकडूनही तो बरचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे. रैनाला एकही बिडर मिळाला नाही, तर आयपीएलमध्ये तो प्रथमच UNSOLD ठरु शकतो. मागच्यावर्षी व्यक्तीगत कारणांमुळे तो UAE मध्ये झालेल्या आयपीएलमध्ये खेळू शकला नव्हता.
सुरेश रैनाची बेस प्राइस दोन कोटी रुपये होती. सुरेश रैना आणि चेन्नई असं समीकरण ठरलेलं होतं. पण चेन्नईने त्याच्यासाठी बोली लावली नाही. सुरेश रैना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. त्यानंतर तो फार कमी स्थानिक स्पर्धांमध्ये खेळला आहे. खेळण्याचा सराव नसल्यामुळे कदाचित ऑक्शनमध्ये रैनावर कोणी बोली लावली नसेल.
सुरेश रैना आयपीएलमधल्या लिजिंडपैकी एक आहे. त्याने आयपीएलच्या 204 सामन्यात 5528 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्यामध्ये तो चौथ्या स्थानावर आहे. विराट कोहली (6283), शिखर धवन (5784) आणि रोहित शर्मा यांच्या (5611) धावा आहेत.