IPL 2022 CSK vs RCB: मॅच संपल्यानंतर विराट-ऋतुराजमध्ये दिसला ह्दयस्पर्शी ‘दोस्ताना’, नेटीझन्स म्हणाले…

| Updated on: Apr 13, 2022 | 3:56 PM

IPL 2022 CSK vs RCB: चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमधील (CSK vs RCB) सामना संपल्यानंतर स्टेडियमवर काल एक वेगळं दृश्य पहायला मिळालं.

IPL 2022 CSK vs RCB: मॅच संपल्यानंतर विराट-ऋतुराजमध्ये दिसला ह्दयस्पर्शी दोस्ताना, नेटीझन्स म्हणाले...
विराट कोहली-ऋतुराज गायकवाड
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई: चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमधील (CSK vs RCB) सामना संपल्यानंतर स्टेडियमवर काल एक वेगळं दृश्य पहायला मिळालं. चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि आरसीबीचा माजी कॅप्टन विराट कोहलीमध्ये (Virat kohli) ह्दयस्पर्शी ‘दोस्ताना’ पहायला मिळाला. दोघे पॅव्हेलियनच्या दिशेने जात होते, त्यावेळी विराटने ऋतुराजच्या खांद्यावर हात टाकला होता, तर ऋतुराजने विराटच्या कमरेत हात टाकला होता. पॅव्हेलियन जवळ पोहोचल्यानंतर दोघांमध्ये संवाद सुरु झाला. विराट ऋतुराजला काही गोष्टी सांगत होता, तर ऋतुराजही त्याला काहीतरी सांगत होता. विराट आणि ऋतुराजच्या या फोटोने सोशल मीडियावर अनेकांची मन जिंकून घेतली आहेत. सीएसकेचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड सध्या फ्लॉप आहे. मागच्या सीजनमध्ये ऋतुराजला ऑरेंज कॅप मिळाली होती. त्याने एकूण 635 धावा केल्या होत्या. या सीजनमध्ये मात्र ऋतुराजची बॅट तळपलेली नाही. धावांसाठी त्याचा संघर्ष सुरु आहे.

सोशल मीडियावर अनेकांकडून कौतुक

आयपीएलच्या या सीजनमध्ये ऋतुराज गायकवाडने फक्त 35 धावा केल्या आहेत. कालही ऋतुराज फ्लॉप ठरला. पण सीएसकेने त्यांचा पहिला सामना जिंकला. सलग चार पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्सला पहिला विजय मिळवता आला. सामना संपल्यानंतर विराटने ऋतुराज सोबत संवाद साधला. त्याचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला. कोहलीच्या या कृतीचं सोशल मीडियावर अनेकांनी कौतुक केलं आहे. विराटने ऋतुराजच्या खांद्यावर हात टाकला. पण ऋतुराजने असं करणं टाळलं, यातून तो विराट कोहलीचा किती आदर करतो, ते दिसतं असं एका युजरने म्हटलं आहे.

आयपीएल करीयरमधली सर्वोत्तम इनिंग

काल शिवम दुबे आणि रॉबिन उथाप्पाच्या दमदार फलंदाजीच्या बळावर चेन्नई सुपर किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरवर 23 धावांनी विजय मिळवला. रॉबिन उथाप्पाने आयपीएल करीयरमधली सर्वोत्तम इनिंग खेळताना 88 धावा केल्या. शिवम दुबेने नाबाद 95 धावा केल्या. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 165 धावांची भागीदारी केली. चेन्नईने काल यंदाच्या सीजनमधील सर्वाधिक 216 धावा केल्या.