IPL 2022: आला रे आला David Warner, DC बलाढय होणार, कोच रिकी पाँटिगने सांगितली खेळण्याची तारीख

| Updated on: Apr 03, 2022 | 7:00 PM

IPL 2022 दिल्ली कॅपिटल्ससाठी (Delhi Capitals) IPL 2022 स्पर्धेची अपेक्षित सुरुवात झालेली नाही. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीने सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला हरवलं.

IPL 2022: आला रे आला David Warner, DC बलाढय होणार, कोच रिकी पाँटिगने सांगितली खेळण्याची तारीख
एनरिच नॉर्खिया-डेविड वॉर्नर
Image Credit source: BCCI & AFP
Follow us on

मुंबई: दिल्ली कॅपिटल्ससाठी (Delhi Capitals) IPL 2022 स्पर्धेची अपेक्षित सुरुवात झालेली नाही. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीने सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला हरवलं. पण गुजरात टायटन्स विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. एक विजय आणि एका पराभवातून मागच्या दोन-तीन सीजनमधला हाच तो दिल्लीचा संघ का ? असा प्रश्न क्रिकेट फॅन्सना पडला आहे. दिल्ली कॅपिटल्सची ताकत दिसत नाहीय, त्यामागे प्रमुख कारण आहे, परदेशी खेळाडूंची अनुपस्थिती. एनरिक नॉर्खिया, (Anrich nortje) डेविड वॉर्नर (David Warner) आणि मिचेल मार्श सारखे मोठे खेळाडू सुरुवातीच्या सामन्यासाठी उपलब्ध नव्हते. मागच्या महिन्यात झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये दिल्ली कॅपिटल्सने त्यांना विकत घेतलं आहे. पूर्ण ताकतीने दिल्लीचा संघ अजून मैदानावर उतरलेला नाही. हे तीन खेळाडू कधीपासून दिल्लीसाठी उपलब्ध असतील, ते हेड कोच रिकी पाँटिंग यांनी सांगितलं आहे.

‘त्या’ दोघांची प्रतिक्षा

शनिवारी दोन एप्रिलला झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सला 14 धावांनी पराभूत केलं. गोलंदाजीत टीमने चांगली सुरुवात केली होती. पण त्यांना शेवटपर्यंत ती लय टिकवता आली नाही. त्यातच दिल्ली कॅपिटल्सचा संघ आपल्या पूर्ण क्षमतेने फलंदाजी करु शकलेला नाही. टीमला एनरिक नॉर्खिया आणि डेविड वॉर्नर हे कधीपासून खेळणार? याची प्रतिक्षा आहे. एनरिक नॉर्खिया दिल्लीच्या संघासोबत आहे, पण अजून पूर्णपणे फिट झालेला नाही. डेविड वॉर्नर मुंबईत दाखल झाला असून पहिल्या दोन सामन्यांसाठी तो उपलब्ध नव्हता.

परदेशी खेळाडूंबद्दल महत्त्वाची अपडेट

गुजरातकडून पराभव झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचे हेड कोच रिकी पाँटिंग यांनी आपल्या दिग्गज परदेशी खेळाडूंबद्दल अपडेट दिली आहे. एनरिक नॉर्खिया पाठिच्या दुखण्यामुळे मागच्यावर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या टी 20 वर्ल्डकपपासून खेळलेला नाही. “काल शनिवारी सकाळी सरावा दरम्य़ान नॉर्खियाने पूर्ण क्षमतेने गोलंदाजी केली. नॉर्खियाला अजून असे चार ते पाच स्पेल गोलंदाजी करावी लागले. त्यानंतर त्याला क्रिकेट दक्षिण आफ्रिकेकडून खेळायला परवानगी मिळेल. आमचा पुढचा सामना सात एप्रिलला आहे. त्यावेळी तो निवडीसाठी उपलब्ध असेल, अशी अपेक्षा आहे” असं पाँटिंग यांनी सांगितलं.

वॉर्नर मुंबईत पोहोचला

पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेनंतर ऑस्ट्रेलियात गेलेला डेविड वॉर्नर आता भारतात दाखल झाला आहे. मिचेल मार्श दुखापतीमुळे पूर्णपणे फिट नाहीय. वॉर्नर मुंबईत दाखल झाला आहे. मार्श मुंबईतच असून क्वारंटाइनमध्ये आहे. मार्श 10 मार्चला केकेआर विरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी उपलब्ध असेल अशी अपेक्षा असल्याचं पाँटिंग यांनी सांगितलं. सात एप्रिलला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यालाठी नॉर्खिया आणि वॉर्नर उपलब्ध असतील, अशी माहिती त्यांनी दिली.