IPL 2022 दरम्यान मुंबईच्या माजी क्रिकेटपटूचं वयाच्या 40 व्या वर्षी हार्ट अटॅकने निधन

| Updated on: Apr 24, 2022 | 5:29 PM

Rajesh Verma Death: राजेश वर्मा यांनी 2002/03 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये डेब्यु केला होता. 2008 साली ब्रेबॉन स्टेडियमवर ते पंजाब विरुद्ध अखेरचा सामना खेळले होते.

IPL 2022 दरम्यान मुंबईच्या माजी क्रिकेटपटूचं वयाच्या 40 व्या वर्षी हार्ट अटॅकने निधन
राजेश वर्मा रणजीपटू
Image Credit source: File photo
Follow us on

मुंबई: मुंबईचे माजी क्रिकेटपटू राजेश वर्मा (Rajesh Verma) यांचं आज ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने (Heart attack) निधन झालं. ते फक्त 40 वर्षांचे होते. मुंबईच्या 2006-07 सालची रणजी विजेत्या (Ranji Team) संघाचे ते सदस्य होते. माजी रणजीपटू भाविन ठक्कर यांनी राजेश वर्मा यांच्या निधनाची माहिती दिली. राजेश वर्मा फर्स्ट क्लासचे फक्त सात सामने खेळले. 2006-07 सालच्या मुंबईच्या रणजी विजेत्या संघाचे ते प्रमुख सदस्य होते. आयपीएलचा 15 वा हंगाम मध्यावर असतानाचा राजेश वर्मा यांचं निधन झालं आहे. आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये सामना होणार आहे.

अखेरचा सामना कधी खेळले?

राजेश वर्मा यांनी 2002/03 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये डेब्यु केला होता. 2008 साली ब्रेबॉन स्टेडियमवर ते पंजाब विरुद्ध अखेरचा सामना खेळले होते.

प्रथम श्रेणीत कशी होती कामगिरी?

प्रथम श्रेणीच्या सात सामन्यात राजेश वर्मा यांनी 23 विकेट काढल्या. यात एकाच डावात त्यांनी पाच विकेट काढल्या होत्या. 5/97 ही त्यांची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. लिस्ट ए चे 11 सामने खेळले. या सामन्यात त्यांनी 20 विकेट काढल्या.