मुंबई: भारतात दोन गोष्टी लोकप्रिय आहेत, ते म्हणजे बॉलिवूड (Bollywood) आणि क्रिकेट. बॉलिवूड आणि क्रिकेटची (Cricket) आवड नसलेले अरसिक तुम्हाला फार अभावानेच सापडतील. भारतात सर्वसामान्य क्रिकेट आणि बॉलिवूडबद्दल नेहमीच भरभरुन बोलतात. भारतातील क्रिकेट चाहत्यांना तोंडाने कॉमेंट्री करण्यात कोणीच रोखू शकत नाही. अनेक रेकॉर्ड त्यांच्या तोंडावर असतात. कोणी कुठल्या सामन्यात किती धावा केल्या, हे ते सहजतेने सांगतात. बॉलिवूडबद्दल त्यांचं प्रेम असचं आहे. त्यामुळे भारतात बॉलिवूड आणि क्रिकेटच एक वेगळ नात आहे. बॉलिवूडचे अनेक कलाकार क्रिकेटचे मोठे चाहते आहेत, तर क्रिकेटपटुंवरही बॉलिवूडची मोहिनी आहे. अनेक प्रसिद्ध क्रिकेटपटुंनी अभिनेत्रींसोबत संसार थाटला आहे. बॉलिवूडनेही क्रिकेट वर बनवलेले सिनेमे नेहमीच गाजले आहेत. आमिर खानचा (Aamir Khan) ऑस्करपर्यंत मजल मारणारा ‘लगान’ चित्रपट हा त्यापैकीच एक. आमिर खान क्रिकेटचा खूप मोठा चाहता आहे. मुंबईत टीम इंडियाचे सामने असताना, तो अनेकदा वानखेडे स्टेडियममध्ये भारतीय संघाला चिअरअप करताना दिसला आहे.
आमिर खान पुन्हा चर्चेत येण्यामागचं एक कारण आहे, ते म्हणजे त्याची कॉमेंट्री आणि ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपट. आमिर आयपीएल फायनलच्यावेळी स्टार स्पोर्ट्सच्या स्टुडिओमध्ये कॉमेंट्री करताना दिसला होता. याचवेळी आमिर खानने त्याच्या आगामी ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज केला.
फायनलच्यावेळी कॉमेंट्री करताना आमिर खानने गुजरात टायटन्सला विजेतेपदासाठी पसंती दिली होती. घडलं सुद्धा तसचं. गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला नमवून पहिल्याच सीजनमध्ये आयपीएलचं जेतेपद आपल्या नावावर केलं. आमिरने यावेळी कॉमेंट्री करताना त्याच्या ‘लगान’ चित्रपटाचा अनुभव सांगितला होता. आमिर सोबत यावेळी कॉमेंट्री बॉक्समध्ये इरफान पठाण, रवी शास्त्री सुद्धा होते. स्टुडिओमध्ये हे तिघे क्रिकेट सुद्धा खेळले. आमिरच्या गोलंदाजीवर इरफान पठानने मारलेला जोरदार फटका एकाला लागला. त्यावर इरफानने खानसाहब ‘कल आपको लगेगी’ असं गमतीशीर कॅप्शन देत व्हिडिओ पोस्ट केला आहे.