IPL 2022 Final: ‘काहीही होवो, आता मला…’, विजेतेपदानंतर Hardik Pandya चं महत्त्वाचं विधान

| Updated on: May 30, 2022 | 12:55 PM

IPL 2022 Final: काल गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सवर (GT vs RR) सात विकेटने विजय मिळवून आयपीएलच्या 15 व्या सीजनच विजेतेपद पटकावलं. हार्दिक पंड्या गुजरातच्या या विजयाचा नायक ठरला.

IPL 2022 Final: काहीही होवो, आता मला..., विजेतेपदानंतर Hardik Pandya चं महत्त्वाचं विधान
Gujarat titans skipper Hardik pandya
Image Credit source: instagram
Follow us on

मुंबई: महत्त्वाच्या सामन्यात संघाला गरज असताना, हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) काल कर्णधारपदालाा साजेसा खेळ दाखवला. बॉल आणि बॅटने त्याने योगदान दिलं. काल गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सवर (GT vs RR) सात विकेटने विजय मिळवून आयपीएलच्या 15 व्या सीजनच विजेतेपद पटकावलं. हार्दिक पंड्या गुजरातच्या या विजयाचा नायक ठरला. फक्त फायनलमध्येच नाही, त्याने या संपूर्ण सीजनमध्ये दमदार खेळ दाखवला. कॅप्टन म्हणून स्वत: पुढे राहून त्याने इतरांसमोर उद्हारण ठेवलं. हार्दिकच्या याच वेगळेपणाने क्रिकेटच्या जाणकारांना प्रभावित केलय. सीजन सुरु होण्याआधी हार्दिक पंड्याच्या फिटनेसबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होतं. तो गोलंदाजी करु शकेल का? असा प्रश्न होता. पण कालच्या फायनलमध्ये त्याने जोस बटलर, (Jos buttler) संजू सॅमसन आणि शिमरॉन हेटमायर हे महत्त्वाचे विकेट्स मिळवले.

पत्रकार परिषदेत हार्दिक काय म्हणाला?

“भारतासाठी वर्ल्ड कप जिंकणं हे माझं लक्ष्य आहे. त्यासाठी मी माझ्या बाजूने सर्व परिश्रम करीन, शक्य असेल ते सर्व करेन” असं हार्दिक पंड्याने विजेतेपद मिळवल्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितलं.

स्वप्न साकार झालं

“काहीही होवो, भारतासाठी वर्ल्डकप जिंकणं हेच माझं लक्ष्य आहे. त्यासाठी मला जे शक्य आहे, ते सर्व करीन. मी नेहमीच संघाला प्रथम प्राधान्य देणारा खेळाडू राहिलो आहे. भारतासाठी खेळण्याचं स्वप्न साकार झालं. भारताचं प्रतिनिधीत्व करणं ही नेहमीच माझ्यासाठी समाधानाची बाब राहिली आहे. काहीही होवा, भारतासाठी वर्ल्ड कप जिंकणं हे माझं लक्ष्य आहे” असं हार्दिक पत्रकार परिषदेत म्हणाला.

ऑलराऊंडर परफॉर्मन्स

आयपीएल 2022 सीजनमध्ये हार्दिक पंड्याने ऑलराऊंडर परफॉर्मन्स दिला. त्याने बॅटने 487 धावा केल्या. गोलंदाजी करताना आठ विकेट काढल्या. फायनलमध्ये त्याने चार ओव्हर्समध्ये 16 धावा देत 3 विकेट काढल्या व 34 धावा बनवल्या. गुजरातने अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. त्यांनी राजस्थान रॉयल्सला निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 130/9 वर रोखलं. राजस्थानकडून जोस बटलरने सर्वाधिक 39 धावा केल्या.

दोन टीम्स टॉपवर होत्या

डेविड मिलर आणि शुभमन गिल या जोडीने गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. गिलने नाबाद 45 आणि मिलरने नाबाद 34 धावा केल्या. पॉइंट्स टेबलमध्ये गुजरात टायटन्सचा संघ टॉपवर होता. राजस्थानचा संघ दुसऱ्या स्थानावर. या दोन टीम्स टॉपवर होत्या. फायनलही या दोन संघातच झाली.