मुंबई: इंडियन प्रिमियर लीगचा (IPL) यंदाचा 15 वा हंगाम आहे. आयपीएलच्या या मोसमात आठऐवजी दहा संघ खेळणार आहेत. लखनऊ आणि अहमदाबाद हे आयपीएलमध्ये दोन नवीन संघ आहेत. लखनऊने आपल्या टीमचं लखनऊ सुपरजायंट्स (Lucknow super giants) असं नामकरण केलं आहे. आता अहमदाबादनेही आपल्या टीमचं (Ahmedabad Franchise) नामकरण केल्याची बातमी आहे. अहमदाबादने ‘अहमदाबाद टायटन्स’ असं नाव ठेवलं आहे. येत्या 12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळुरुमध्ये मेगा ऑक्शन पार पडणार आहे. अहमदाबाद टायटन्सचं नेतृत्व हार्दिक पंड्या करणार आहे. दहा संघांमुळे IPL मध्ये यंदा 74 सामने होणार आहेत. अहमदाबादच्या संघात शुभमन गिल आणि अफगाणिस्तानचा लेग स्पिनर राशिद खान आहे. कोचिंग स्टाफमध्ये आशिष नेहरा आणि गॅरी कर्स्टन ही दोन मोठी नाव आहेत.
राशिद खान सनरायजर्स हैदराबादसाठी खेळत होता. अहमदाबादने राशिदसाठी 15 कोटी रुपये मोजले आहेत. हार्दिकसाठी सुद्धा टीमने 15 कोटी खर्च केलेत. शुभमन गिलला आठ कोटी रुपयांमध्ये घेतलं आहे. पंड्या याआधी मुंबई इंडियन्स आणि शुभमन गिल केकेआरसाठी खेळत होता.
अहमदाबाद संघाला बीसीसीआयकडून हिरवा कंदिल मिळवताना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. या संघाचा मालकी हक्क सीवीसी कॅपिटल्सकडे आहे. या कंपनीचे परदेशात सट्टेबाजी करणाऱ्या कंपनीसोबत संबंध असल्याची चर्चा होती. बीसीसीआयने चौकशीचे आदेशही दिले होते. सर्व खातरजमा करुन घेतल्यानंतरच बीसीसीआयने अंतिम परवानगी दिली.
IPL 2022 Hardik pandya Ahmedabad Franchise Officially Names Itself Ahmedabad Titans