IPL 2022 MI vs PBKS: अखेर जाँटी ऱ्होडसने सचिनचे पाय पकडून आशिर्वाद घेतलाच, पहा VIDEO

| Updated on: Apr 14, 2022 | 10:39 PM

IPL 2022 MI vs PBKS: सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) क्रिकेटचा देव म्हटलं जातं. त्याचे रेकॉर्ड्सच (Records) सर्वकाही सांगून जातात. सचिनला क्रिकेटची प्रचंड समज आहे.

IPL 2022 MI vs PBKS: अखेर जाँटी ऱ्होडसने सचिनचे पाय पकडून आशिर्वाद घेतलाच, पहा VIDEO
सचिन तेंडुलकर-जाँटी ऱ्होडस
Image Credit source: ipl/twitter
Follow us on

मुंबई: सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) क्रिकेटचा देव म्हटलं जातं. त्याचे रेकॉर्ड्सच (Records) सर्वकाही सांगून जातात. सचिनला क्रिकेटची प्रचंड समज आहे. तो एक महान क्रिकेटपटू आहे, हे कोणीही नाकारणार नाही. सचिन क्रीझवर असताना, प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना नेहमीच त्याचा धाक वाटायचा. दोन दशकांपेक्षा अधिक कारकीर्द असलेल्या सचिनने एका पिढीला क्रिकेट खेळण्यासाठी प्रेरणा दिली. सचिन आता क्रिकेटच्या मैदानातून निवृत्त झाला असला, तरी आजही त्याची सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये गणना होते. सचिन ज्या-ज्या गोलंदाजांना खेळला, त्या प्रत्येकावर त्याने राज्य केलं आहे. सचिनने 200 कसोटी, (Test) 463 वनडे आणि एका टी 20 सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केलं. त्याने कसोटी आणि वनडे दोन्ही फॉर्मेटमध्ये खोऱ्याने धावा केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम त्याच्या नावावर आहे.

जाँटी ऱ्होडसही सचिनचा मोठा चाहता

सचिनचा 100 शतकांचा विक्रम मोडण्याच्या जवळपासही कोणी नाही. रिकी पाँटिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत झाला असून त्याने 71 शतक झळकावली आहेत. विराट कोहलीच्या नावावर 70 शतक आहेत. पण सध्या विराटचा फॉर्मसाठी संघर्ष सुरु आहे. कोणी सचिनचा विक्रम मोडला, तरी त्याची सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्येच गणना होईल. दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जाँटी ऱ्होडसही सचिनचा मोठा चाहता आहे. त्यालाही सचिनच्या क्षमतेची चांगली कल्पना आहे.

परस्परांना हस्तांदोलन करत होते

काल मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्समध्ये आयपीएलचा 23 वा सामना झाला. दोन्ही संघांचे खेळाडू सामना संपल्यानंतर परस्परांना हस्तांदोलन करत होते. यावेळी सचिन समोर आल्यानंतर जॉन्टीने खाली वाकून त्याच्या पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. जॉन्टी ऱ्होडसला सचिनचा आशिर्वाद हवा होता. पण सचिन त्याला पाय पडू देत नव्हता. अखेर जाँटीने सचिनच्या पायाला स्पर्श करुन आशिर्वाद घेतलाच.

भारतीय संस्कृती विशेष भावते

जाँटी ऱ्होडसला भारताबद्दल विशेष प्रेम आहे. भारतातही त्याला आदर दिला जातो. जाँटी ऱ्होडसला भारतीय संस्कृती विशेष भावते. त्यामुळे भारतात आल्यानंतर तो नेहमीच भारतीय संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतो. सचिनच्या चरणांना स्पर्श करुन जाँटीने भारतीय संस्कृतीबद्दलचा आदर दाखवून दिला.