मुंबई: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आयपीएलमधला एक बलाढ्य संघ समजला जातो. पण यंदाच्या सीजनमध्ये ही टीम खूपच खराब फॉर्ममध्ये आहे. मुंबई इंडियन्सचा सलग आठ सामन्यात पराभव झाला आहे. या सीजनमध्ये मुंबई इंडियन्स एकतरी सामना जिंकेल? असा प्रश्न विचारला जातोय. मुंबई इंडियन्सकडे भरवाशाच्या खेळाडूंची कमतरता हेच त्यांच्या पराभवाचं मुख्य कारण आहे. मागच्या सीजनपर्यंत मुंबईकडून खेळणाऱ्या अनेक खेळाडूंना मेगा ऑक्शनमध्ये दुसऱ्या संघांनी विकत घेतलं. कृणाल पंड्या (Krunal pandya) सुद्धा अशाच खेळाडूंपैकी एक. पंड्या बंधू मुंबई इंडियन्सचा आधारस्तंभ होते. पण आता हे दोघेही वेगवेगळ्या टीमकडून खेळतात. रविवारी मुंबई आणि लखनौमध्ये सामना झाला. त्यावेळी दोन जुने खेळाडू आमने-सामने आले होते. कृणाल पंड्या आता लखनौकडून तर पोलार्ड (kieron pollard) अजूनही मुंबईकडूनच खेळतोय. कालच्या सामन्यात कृणालने पोलार्डची विकेट काढली. त्यानंतरच्या कृणालने जे केलं, त्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. मुंबई इंडियन्सचा या सामन्यात पराभव झाला. 36 धावांनी मुंबईने हा सामना गमावला. प्लेऑफमधून मुंबईचं आव्हान जवळपास संपुष्टातच आलं आहे.
कालच्या सामन्यात पोलार्ड 19 रन्सवर आऊट झाला. बाद झाल्यानंतर तो पॅव्हेलियनकडे जात होता. त्यावेळी त्याची विकेट मिळाल्यामुळे आनंदात असलेल्या कृणालने पाठिमागून पोलार्डच्या अंगावर उडी मारली व त्याचं चुंबन घेतलं. पोलार्ड चेंडूकडे बघत होता. या दरम्यान कृणालने त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. पण पोलार्ड पुढे निघून गेला होता. यावेळी कृणालने पाठिमागून पोलार्डच्या पाठिवर उडी मारली व त्याच्या डोक्याचं चुंबन घेतलं.
A kiss on the head by Krunal Pandya to Kieron Pollard. #LSGvsMI #LSG #MIvsLSG #RohitSharma? pic.twitter.com/UcsYTig2vh
— chakdecricket (@chakdecricket1) April 24, 2022
पंड्या बंधु आणि पोलार्डमध्ये चांगली मैत्री आहे. तिघेही मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्यांच्या मैत्रीची चर्चा व्हायची. पोलार्ड आणि आमच्यात चांगली मैत्री असून तीन भावांसारखे आम्ही आहोत, हे अनेकदा पंड्या बंधुंनी मान्य केलं आहे. आता तिघेही वेगवेगळ्या संघांकडून खेळतात. पण मैदानावरील त्यांच्यातील स्पर्धा अजिबात कमी झालेली नाही. कृणालने या सीजनमध्ये आपल्या भावाची हार्दिकचीही विकेट काढली. हार्दिक पंड्या गुजरात टायटन्सचा कॅप्टन आहे.