मुंबई: पंजाब किंग्सच्या (Punjab kings) डावात 15 षटकांचा खेळ पूर्ण झाला होता. पुढच्या पाच षटकात त्यांना विजयासाठी 27 धावांची गरज होती. गुजरात टायटन्सकडून (Gujarat Titans) मोहम्मद शमी 16 व षटक टाकण्यासाठी आला. समोर आक्रमक फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोन (Liam Livingstone) होता. लिव्हिंगस्टोनने शमीच्या गोलंदाजीची जी हालत केली, कदाचितच याआधी दुसऱ्या कुठल्या फलंदाजाने केली असेल. दुसऱ्या फलंदाजाने शामीची गोलंदाजी फोडूनही काढली असेल, तरी त्यात इतकी भयावहता नसेल. लिव्हिंगस्टोन आपल्या गोलंदाजीची अशी हालत करेल, याचा विचार स्वत: शमीने सुद्धा केला नसेल. पण मैदानात लिव्हिंगस्टोनकडून शमीच्या गोलंदाजीला खूप वाईट ट्रीटमेंट मिळाली. लियाम लिव्हिंगस्टोनने सामना संपल्यानंतर आज बॅटिंग करायला मजा आल्याचं सांगितलं, पण शमीच्या मनाची काय अवस्था झाली असेल, हे त्यालाच ठाऊक. लियाम लिव्हिंगस्टोन बॅट तलवारीसारखी चालवत होता. शमीच्या चेंडूवर होणारे प्रहार पाहून मन सुन्न होत होतं.
लिव्हिंगस्टोनने शमी सोबत असं काय केलं, ते जाणून घ्या. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर लिव्हिंगस्टोन खूप धुलाई केली. 16 व्या षटकाचा पहिला चेंडू टाकण्याआधी शमीला सुद्धा माहित नव्हतं, आपल्यासोबत काय घडणार. शमीला पहिल्याच चेंडूवर लिव्हिंगस्टोनने लांबलचक षटकार खेचला. त्या सामन्यातलचा नव्हे, तर आयपीएल 2022 मधला तो लांबलचक षटकार ठरला. लिव्हिंगस्टोनने 117 मीटर लांब हा षटकार मारला. म्हणजे चेंडू स्टेडियमच्या बाहेर गेला. शमीच्या चेहऱ्यावर हास्य होते. पण त्या हसण्यामागे वेदना होती.
मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर लिव्हिंगस्टोनने कसा प्रहार केला, क्लिक करुन पहा या VIDEO मध्ये
?? ?????? ????? ???? ????? ? ??
?? ????? ????? ???? ????? ???? ????… ?#SaddaPunjab #PunjabKings #IPL2022 #ਸਾਡਾਪੰਜਾਬ #GTvPBKS @liaml4893 pic.twitter.com/sserXgw7Zv— Punjab Kings (@PunjabKingsIPL) May 3, 2022
पहिल्या चेंडूवर सिक्स मारल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर लिव्हिंगस्टोन शांत राहील असं वाटलं. पण तसं काहीच झालं नाही. त्याने दुसऱ्या चेंडूवरही सिक्स मारला. यावेळी 96 मीटर लांब सिक्स मारला. तिसऱ्या चेंडूवरही लिव्हिंगस्टोनने सिक्स मारला. शमीच्या तीन चेंडूंवर तीन सिक्स मारुन त्याने हॅट्ट्रीक केली. मोहम्मद शमीने चौथा चेंडू थोडा धीमा टाकला. या बॉलवर सिक्स नाही पण चौकार खाल्ला. पाचव्या चेंडूवर दोन धावा काढल्या व शेवटच्या चेंडूवर विजयी चौकार लगावला.