KXIP New Captain of IPL 2022: प्रिती झिंटाच्या पंजाब किंग्सची मोठी घोषणा, नव्या कॅप्टनचं नाव जाहीर

| Updated on: Feb 28, 2022 | 1:01 PM

IPL 2022: आयपीएल 2022 मध्ये केएल राहुलने (KL Rahul) पंजाब किंग्सची साथ सोडल्यानंतर पुढचा कॅप्टन कोण होणार? हा प्रश्न पडला होता. अखेर या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे.

KXIP New Captain of IPL 2022: प्रिती झिंटाच्या पंजाब किंग्सची मोठी घोषणा, नव्या कॅप्टनचं नाव जाहीर
prity-zinta
Follow us on

IPL 2022: आयपीएल 2022 मध्ये केएल राहुलने (KL Rahul) पंजाब किंग्सची साथ सोडल्यानंतर पुढचा कॅप्टन कोण होणार? हा प्रश्न पडला होता. अखेर या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. अभिनेत्री प्रिती झिंटाच्या (Preity Zinta) किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने कॅप्टन कोणाला करायचं? त्या बाबत अंतिम निर्णय घेतला आहे. पंजाब किंगसने कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे. केएल राहुल पंजाबची साथ सोडून लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळण्याचा निर्णय घेतला, तेव्हापासून पंजाब किंग्सचा पुढचा कॅप्टन कोण? याबद्दल उत्सुक्ता होती. अखेर ते नाव समोर आलं आहे. मयंक अग्रवालची (Mayank Agarwal) किंग्स इलेवन पंजाब संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. मयंक अग्रवालला पंजाब किंग्सने 12 कोटी रुपये देऊन रिटेन केलं होतं.

मयंकला कॅप्टन बनल्यानंतर पंजाब किंग्सची टीम आता 15 मार्चपासून मुंबईत आयपीएल 2022 साठी सराव सुरु करेल. मयंक अग्रवालला पंजाब किंग्सने 12 कोटी रुपयांमध्ये रिटेन केलं होतं. मागच्या काही सीजन्समध्ये मयंकने पंजाबसाठी जबरदस्त प्रदर्शन केलं आहे. मयंक अग्रवाल 2018 पासूनच पंजाब किग्ससाठी खेळतोय. मागच्या दोन सीजनमध्ये त्याने पंजाबसाठी 400 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

“पंजाब किंग्स संघाचं कर्णधारपद मिळणं, हा मी माझा सन्मान समजतो. आयपीएल 2022 मध्ये पंजाब किंग्सचं मी निश्चित आनंदाने नेतृत्व करेन” असं मयंकने आपल्या संदेशात म्हटलं आहे.

कॅप्टन झाल्यानंतर मयंक अग्रवालने म्हटलं….

“मी 2018 पासून पंजाब किंग्सचा भाग आहे. एका उत्तम संघाचं प्रतिनिधीत्व करण्याची मला संधी मिळतेय, याचा निश्चित मला अभिमान आहे. आता मला संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळालीय, त्यामुळे मी निश्चित आनंदी आहे. मी प्रामाणिकपणे जबाबदारी निभावण्याचा प्रयत्न करीन. या सीजनमध्ये किंग्स इलेवन पंजाबच्या संघात जे खेळाडू आहेत, त्यामुळे माझं काम अधिक सोपं होईल, असा विश्वास मयंकने व्यक्त केला. आमच्याकडे मोठा अनुभव असलेले तसेच प्रतिभावान युवा खेळाडू आहेत. जे योग्य संधीच्या प्रतिक्षेत आहेत” असं मयंक अग्रवालने म्हटलं आहे.

IPL 2022 Mayank Agarwal named new captain of Preity Zints Punjab Kings for IPL 2022