IPL 2022: मेगा ऑक्शनमध्ये किती क्रिकेटपटुंवर लागणार बोली, अंतिम यादी झाली जाहीर, जाणून घ्या सर्वकाही

| Updated on: Feb 01, 2022 | 6:23 PM

आयपीएल 2022 साठी (IPL -2022) एकूण 1,214 खेळाडुंनी रजिस्ट्रेशन केलं होतं. पण बीसीसीआयने रजिस्ट्रेशनच्या यादीवर कात्री लावत अंतिम यादी प्रसिद्ध केली आहे.

IPL 2022: मेगा ऑक्शनमध्ये किती क्रिकेटपटुंवर लागणार बोली, अंतिम यादी झाली जाहीर, जाणून घ्या सर्वकाही
Follow us on

मुंबई: इंडियन प्रिमियर लीगच्या (Indian Premier League) यंदाच्या हंगामात एकूण 590 क्रिकेटपटुंवर बोली लागणार (Mega Auction) आहे. बीसीसीआयने मंगळवारी फायनल यादी प्रसिद्ध केली आहे. आयपीएल 2022 साठी (IPL -2022) एकूण 1,214 खेळाडुंनी रजिस्ट्रेशन केलं होतं. पण बीसीसीआयने रजिस्ट्रेशनच्या यादीवर कात्री लावत अंतिम यादी प्रसिद्ध केली आहे. 12 आणि 13 फेब्रुवारी असे दोन दिवस हे मेगा ऑक्शन पार पडणार आहे. या 590 पैकी 228 कॅप्ड खेळाडू आहेत. 355 अनकॅप्ड खेळाडू आहेत. सात खेळाडू असोसिएट देशाचे आहेत. आयपीएलमध्ये एकूण 10 फ्रेंचायजी या 590 खेळाडूंवर बोली लावतील. यंदाच्या आयपीएलमध्ये लखनऊ आणि अहमदाबाद हे दोन नवीन संघ आहेत. बहुचर्चित आयपीएल स्पर्धेचा हा 15 वा हंगाम आहे. (सर्व 590 खेळाडूंची यादी बघण्यासाठी इथे क्लिक करा)

 

बेस प्राइसचे आकडे

लिलावात सर्वाधिक बेस प्राइस दोन कोटी रुपये आहे. 48 खेळाडूंनी आपली बेस प्राइस दोन कोटी रुपये ठेवली आहे. या यादीत 20 खेळाडूंनी आपली बेस प्राइस 1.5 कोटी रुपये ठेवली आहे. 34 खेळाडूंनी आपली बेस प्राइस एक कोटी रुपये ठेवली आहे.

लिलावात भारतानंतर ऑस्ट्रेलियाचे सर्वाधिक 47 क्रिकेटपटू आहेत. इंग्लंड आणि न्यूझीलंडचे प्रत्येकी 24 क्रिकेटपटू आहेत. वेस्ट इंडिजचे 34, दक्षिण आफ्रिकेचे 33 आणि श्रीलंकेचे 23 खेळाडू आहेत. अफगाणिस्तानचे 17 खेळाडू आहेत. बांगलादेश-आयर्लंडचे प्रत्येकी पाच, झिम्बाब्वेचा एक, नांबियाचे तीन, नेपाळचा एक, स्कॉटलंडचे दोन आणि अमेरिकेचा एक खेळाडू आहे.