मुंबई : आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनसाठी (IPL 2022 Mega Auction) 590 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. 12 आणि 13 फेब्रुवारीला होणाऱ्या मेगा ऑक्शनमध्ये अनेक मोठ्या नावांवर पैशांचा पाऊस पडणार आहे. या वेळी मेगा ऑक्शनसाठी 220 परदेशी खेळाडूंची (Overseas Cricket Players) निवड करण्यात आली आहे, परंतु गेल्या हंगामात कोट्यवधी रुपये मिळालेल्या या खेळाडूंमधील अशी 3 मोठी नावे गायब आहेत. या तिन्ही खेळाडूंना मिळून 33.8 कोटी रुपये मिळाले होते. पण यावेळी ते लिलावात (Auction) दिसणार नाहीत.
आयपीएल लिलावात भाग न घेणारे पहिले मोठे नाव म्हणजे काईल जेमिसन. न्यूझीलंडचा हा अष्टपैलू खेळाडू गेल्या वर्षी 15 कोटींमध्ये विकला गेला होता. आरसीबीने या खेळाडूवर मोठा सट्टा लावला होता. जेमिसनने गेल्या मोसमात 9 सामन्यात 65 धावा केल्या आणि 9 विकेट घेतल्या. यावेळी जेमिसनने स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. (सर्व 590 खेळाडूंची यादी बघण्यासाठी इथे क्लिक करा)
गेल्या वर्षी आयपीएल लिलावात 14 कोटींमध्ये विकल्या गेलेल्या जाय रिचर्डसननेही आयपीएल लिलावासाठी आपले नाव नोंदवले नाही. जाय रिचर्डसनला पंजाब किंग्जने विकत घेतले होते. रिचर्डसनने केवळ 3 सामन्यात 15 धावा केल्या आणि केवळ 3 विकेट्स मिळवल्या.
आयपीएल 2021 मध्ये 4.8 कोटी रुपयांना विकला गेलेला डॅन ख्रिश्चन देखील या हंगामात खेळणार नाही. ऑस्ट्रेलियन खेळाडूने गेल्या मोसमात 9 सामन्यात केवळ 14 धावा केल्या होत्या आणि त्याने फक्त 4 विकेट घेतल्या होत्या.
आयपीएल 2022 मध्ये आणखी बरेच मोठे चेहरे यावेळी दिसणार नाहीत. गेल्या मोसमातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या ख्रिस मॉरिसने निवृत्ती घेतली आहे. एबी डिव्हिलियर्सनेही क्रिकेटला अलविदा केला आहे. ख्रिस गेलही या मोसमात खेळणार नाही.
इतर बातम्या
IPL 2022: मेगा ऑक्शनमध्ये कुठल्या संघाला किती कोटी खर्च करता येणार, ते आर्थिक गणित समजून घ्या…
IPL 2022: मेगा ऑक्शनमध्ये किती क्रिकेटपटुंवर लागणार बोली, अंतिम यादी झाली जाहीर, जाणून घ्या सर्वकाही