मुंबई: कायरन पोलार्ड (kieron pollard) मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) हुकूमी एक्का आहे. पण त्याच्या फॉर्मवर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. कारण राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्धच्या सामन्यात पोलार्डने गोलंदाजी आणि फलंदाजीत निराश केलं होतं. सामना रोमांचक स्थितीमध्ये असेल किंवा हाणामारीच्या षटकात पोलार्ड म्हणजे चौकार-षटकाराची हमखास गॅरेंटी. पण राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात तो जुना पोलार्ड दिसला नव्हता. त्याचं पोट पाहून फिटनेसबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. आता तो पोलार्ड राहिला नाही, असं मुंबई इंडियन्सच्या काही फॅन्सच मत आहे. पण आज कायरन पोलार्डन अजूनही आपण संपलो नसल्याचं दाखवून दिलं. त्याने केकेआरकडून खेळणारा ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्सची गोलंदाजी झोडून काढली. त्याने पॅट कमिन्सच्या शेवटच्या षटकात 23 धावा वसूल केल्या.
कमिन्सच्या 20 वी ओव्हर टाकत होता. पोलार्डने पहिल्या चेंडूवर सिक्स मारला. त्यानंतर शेवटचे दोन चेंडूही त्याने प्रेक्षक गॅलरीत पाठवले. पोलार्डने पाच चेंडूत 22 धावा केल्या.
मुंबई इंडियन्सला धावफलकावर 161 ही सन्मानजनक धावसंख्या पाहता आली, ती सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मामुळे. त्यांनी मुंबईचा अडचणीत असलेला डाव सावरला. सूर्यकुमार यादवने 36 चेंडूत 52 धावा केल्या. यात पाच चौकार आणि दोन षटकार होते. तिलक वर्माने 27 चेंडूत 38 धावा करुन चांगली साथ दिली. तिलकने तीन चौकार आणि दोन षटकार मारले. चौथ्या विकेटसाठी दोघांनी 83 धावांची भागीदारी केली. मुंबई इंडियन्सने 15 व्या षटकानंतर फलंदाजीचा गियर बदलला. शेवटच्या पाच षटकात मुंबई इंडियन्सने 75 धावा वसूल केल्या. त्याआधी मुंबई इंडियन्सने सावध फलंदाजी केली.
2⃣2⃣ runs
5⃣ balls
3⃣ sixesJust Pollard तात्या things. ?♂️#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians #KKRvMI @KieronPollard55 pic.twitter.com/PlnluWs9BA
— Mumbai Indians (@mipaltan) April 6, 2022
रोहित शर्मा-इशान किशन आज अपेक्षित कामगिरी करु शकले नाहीत. इशानने आज 21 चेंडूत 14 धावा केल्या. रोहित तीन धावांवर आऊट झाला. दोघांनी खूपच सावध फलंदाजी केली. आज मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करणाऱ्या डेवाल्ड ब्रेविसच्या बॅटिंगमध्ये धावांची भूक दिसली. बेबी एबी म्हटल्या जाणाऱ्या ब्रेविसने 19 चेंडूत 29 धावा करताना दोन चौकार आणि दोन षटकार लगावले.