IPL 2022 MI Dewald Brevis: बेबी एबीचं कौतुक करायला सचिन, रोहित धावत आले, पण डेवाल्डची कमकुवत बाजू सुद्धा समजली

| Updated on: Apr 14, 2022 | 3:38 PM

IPL 2022 च्या काल झालेल्या 23 व्या सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सला (MI vs PBKS) हरवलं. मुंबई इंडियन्सची टीम पुन्हा एकदा पहिला विजय मिळवण्यात अपयशी ठरली.

IPL 2022 MI Dewald Brevis: बेबी एबीचं कौतुक करायला सचिन, रोहित धावत आले, पण डेवाल्डची कमकुवत बाजू सुद्धा समजली
मुंबई इंडियन्स डेवाल्ड ब्रेविस
Image Credit source: instagram
Follow us on

मुंबई: IPL 2022 च्या काल झालेल्या 23 व्या सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सला (MI vs PBKS) हरवलं. मुंबई इंडियन्सची टीम पुन्हा एकदा पहिला विजय मिळवण्यात अपयशी ठरली. मुंबई इंडियन्सने सलग पाच सामने गमावले आहेत. मुंबईचा संघ सातत्याने हरत असला, तरी तिलक वर्मा आणि डेवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis) या दोन युवा खेळाडूंनी आपली छाप सोडली आहे. डेवाल्ड ब्रेविसने काल आपल्या आक्रमक फलंदाजीने क्रिकेट चाहत्यांच मन जिंकलं. 25 चेंडूत त्याने 49 धावा फटकावल्या. यात पाच षटकार आणि चार चौकारांचा समावेश होता. त्याने 196 च्या स्ट्राइक रेटने ही फटकेबाजी केली. डेवाल्ड ब्रेविसने पहिल्या आठ चेंडूंवर खातही उघडल नव्हतं. पण नंतर 17 चेंडूंमध्ये त्याने नऊ चौकार लगावले. ब्रेविसच्या या दमदार फलंदाजी दरम्यान प्रतिस्पर्धी संघाला त्याची कमकुवत बाजू सुद्धा समजली आहे.

सचिन सुद्धा धावत आला

बेबी एबीच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या डेवाल्डने आपल्या धमाकेदार खेळीने क्रिकेट चाहत्यांसोबत रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर या दिग्ग्जांच मन सुद्धा जिंकलं. डेवाल्डने लेग स्पिनर राहुल चाहरच्या एका ओव्हरमध्ये सलग चार चेंडूंवर चार षटकार खेचले. या नंतर टाइम आऊट दरम्यान रोहित शर्मा आणि सचिन तेंडुलकरने मैदानावर जाऊन डेवाल्ड ब्रेविसचं कौतुक केलं.

डेवाल्ड ब्रेविसची कमजोरी कुठली?

तुम्हाला आता प्रश्न पडला असेल, डेवाल्ड ब्रेविसची कमकुवत बाजू कुठली?. ब्रेविसच्या फलंदाजीतला कमकुवत दुवा पहिल्या आठ चेंडूतच समोर आला. पंजाबच्या गोलंदाजांनी जेव्हा-जेव्हा बेबी एबी चौथ्या किंवा पाचव्या स्टंम्पवर गोलंदाजी केली, तेव्हा ब्रेविस संघर्ष करताना दिसला. ब्रेविसला चेंडू समोर किंवा मिड विकेटला खेळणं आवडतं. मिडल स्टंम्पवर चेंडू आल्यानंतर डेवाल्ड आरामात खेळतो. पण ऑफ स्टम्पच्या बाहेर जाणारे चेंडू सुद्धा मिड विकेट, लॉन्ग ऑनला फटकावण्याचा प्रयत्न करतो. ऑफ स्टम्पच्या बाहेर त्याला सातत्याने गोलंदाजी करणं, हाच त्याला रोखण्याचा उत्तम प्लान आहे.