मुंबई: मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) चाहत्यांनी शनिवारी सुटकेचा निश्वास सोडला. सलग आठ पराभवानंतर अखेर पहिला विजय मिळवला. मोसमातील पहिला विजय मिळवून रोहित शर्माला (Rohit sharma) काल टीमने बर्थ डे गिफ्ट दिलं. राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्सने (MI vs RR) पाच विकेट राखून विजय मिळवला. प्लेऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्सचा संघ आधीच बाहेर गेलाय. फक्त प्रतिष्ठा राखण्यासाठी अन्य सामन्यात विजय मिळवणं, त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. आयपीएल लीगमध्ये पहिल्यांदाच कुठलातरी संघ सलग आठ मॅच हरला आहे. मुंबई इंडियन्सची टीम आता उर्वरित सर्व सामने जिंकूनही प्लेऑफसाठी क्वालिफाय करु शकत नाही. पण असं असलं तरी, ते बाकी संघांचा खेळ मात्र नक्की बिघडवू शकतात.
आयपीएलमध्ये यंदा आठ ऐवजी 10 संघ खेळतायत. गुणतालिकेची स्पर्धा अधिकच इंटरेस्टिंग झाली आहे. दोन पॉइंटस बरोबर नेट रनरेटही तितकाच आवश्यक बनला आहे. मुंबई इंडियन्सचे अजून पाच सामने बाकी आहेत. प्रत्येक सामन्यात मुंबई इंडियन्सच्या विजयामुळे दुसऱ्या संघाचा खेळ बिघडू शकतो.
मुंबई इंडियन्सला आता फक्त पाच सामने खेळायचे आहेत. गुजरात टायटन्स, कोलकाता नाइट रायडर्स, सनरायजर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स बरोबर त्यांचे हे सामने होतील. गुजरात टायटन्सचा संघ आधीच प्लेऑफमध्ये पोहोचलाय. म्हणजे मुंबई इंडियन्सने त्यांना हरवलं, तरी फार फरक पडणार नाही. त्यानंतरचा सामना कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध आहे. केकेआरचे नऊ सान्यात सहा गुण झाले आहेत. त्यांचेही अजून पाच सामने बाकी आहेत. अजून एकापराभवामुळे केकेआरचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर जाऊ शकतो. सनरायजर्स हैदराबादचा संघ चौथ्या स्थानावर आहे. आठ सामन्यात त्यांचे 10 गुण झालेत. उर्वरित सहा सामन्यात त्यांना कमीत कमी अजून दोन विजय आवश्यक आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सकडून पराभूत झाल्यानंतरही त्यांना संधी असेल.
Everything feels normal again! ?
Lovely performance, boys! ??#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians #RRvMI pic.twitter.com/PrnpTSdJr6
— Mumbai Indians (@mipaltan) May 1, 2022
मुंबईचा चौथा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध आहे. त्यांची हालतही मुंबई सारखीच आहे. मुंबईला आतापर्यंत एकंमेव विजय मिळालाय, तर चेन्नईच्या खात्यात चार पॉइंटस आहेत. अजूनपर्यंत चेन्नईचा संघ प्लेऑफमधून बाहेर पडलेला नाही. पण त्यांच्या पुढे जाण्याची शक्यताही कमी आहे. मुंबई विरुद्धचा पराभव त्यांच्या प्लेऑफच्या अपेक्षांवर पाणी फिरवू शकतो. मुंबईचा शेवटचा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आहे. दिल्लीची टीम आठ सामन्यात चार मॅच जिंकली आहे. मुंबईकडून दिल्ली पराभूत झाली, तर त्यांच्या प्लेऑफमधील समीकरणावर त्याचा परिणाम होईल. दिल्लीला उर्वरित सहा सामन्यांपैकी चार सामन्यात विजय आवश्यक आहे.