मुंबई: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये 2022 (IPL 2022) पंजाब किंग्सच (Punjab Kings) दमदार प्रदर्शन सुरु आहे. या टीमने तीन पैकी दोन सामने जिंकले आहेत. त्यांनी चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर सारख्या मजबूत संघांना हरवलं आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात पंजाब किंग्सचं दमदार प्रदर्शन सुरु आहे. पहिल्या सामन्यात त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) दिलेलं 205 धावांच विशाल लक्ष्य पार केलं. ओडियन स्मिथने या सामन्यात धडाकेबाज खेळ दाखवला होता. आठ चेंडूतील त्याच्या 25 धावांच्या खेळीने सामन्याचं चित्रच बदलून टाकलं होतं. त्यानंतर दुसऱ्या केकेआर विरुद्धच्या सामन्यात त्यांचा पराभव झाला. पण कालच्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात त्यांनी जोरदार कमबॅक केलं.
लियाम लिविंगस्टोन खेळपट्टीवर असताना पंजाबचा संघ 200 धावसंख्याही सहज पार करेल, असं वाटत होतं. पण त्यांना 180 धावाच करत आल्या. त्यानंतर वैभव अरोरा आणि अर्शदीप सिंह या वेगवान गोलंदाजांनी सीएसकेला बॅकफूटवर ढकललं. 36 धावात चेन्नईचा निम्मा संघ तंबूत परतला होता.
पंजाब किंग्सच्या विजयात राहुल चाहरचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्याने आपल्या फिरकी गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघांना दणका दिला आहे. राहुल चाहर पंजाब किंग्सचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याने तीन सामन्यात सहा विकेट घेतल्यात. महत्त्वाचं म्हणजे पाटा पीचवर राहुल चाहरचा इकॉनमी रेट प्रति षटक पाच रन्स आहे. राहुल चाहरने आतापर्यंत एमएस धोनी आणि श्रेयस अय्यर सारख्या फलंदाजांची विकेट काढली आहे. आपला लेग स्पिन आणि गुगलीच्या बळावर कुठल्याही फलंदाजाला मुक्तपणे खेळू देत नाहीय.
राहुल चाहरचं हे प्रदर्शन पाहून मुंबई इंडियन्स टीमला नक्कीच खंत वाटत असेल. राहुल चाहर आधी मुंबई इंडियन्सकडून खेळायचा. पण आयपीएल 2022 आधी या लेग स्पिनरला टीमने रिलीज केलं. त्यानंतर मेगा ऑक्शनमध्ये पंजाब किंग्सने मात दिली. राहुल चाहरची बेस प्राइस फक्त 75 लाख रुपये होती. त्याला सनरायजर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स या टीमने विकत घेण्याचा प्रयत्न केला.
Witnessed yet another Chahar da prahaar last night! ? #SherSquad, how many wickets do you think our ? will end the season with?#PunjabKings #SaddaPunjab #IPL2022 #ਸਾਡਾਪੰਜਾਬ #CSKvPBKS @rdchahar1 pic.twitter.com/WrEAZiWjT2
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 4, 2022
मुंबईने सुद्धा राहुल चाहरवर 4.60 कोटी रुपयांची बोली लावली होती. पण अखेरीस पंजाबने या खेळाडूला 5.25 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. राहुल चाहरने अजूनपर्यंत आपल्या फ्रेंचायजीला निराश केलेलं नाही. त्याने काल चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात चार षटकात 25 धावा देत तीन विकेट घेतल्या.