IPL 2022 MI vs CSK Live Streaming: जाणून घ्या मुंबई विरुद्ध चेन्नई सामना कधी आणि कुठे पाहता येईल?

| Updated on: Apr 21, 2022 | 8:00 AM

रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत आणि हे सर्व सामने त्यांनी गमावले आहेत तर चेन्नईने सहापैकी केवळ एक सामना जिंकला आहे. दोन्ही संघ पॉईंट्स टेबलवर सर्वात तळाशी आहेत.

IPL 2022 MI vs CSK Live Streaming: जाणून घ्या मुंबई विरुद्ध चेन्नई सामना कधी आणि कुठे पाहता येईल?
IPL 2022 MI vs CSK Live Streaming
Image Credit source: IPL
Follow us on

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) स्पर्धेतील दोन सर्वात यशस्वी संघ चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात गुरुवारी नवी मुंबईतल्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर आमनेसामने येतील. मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल ट्रॉफी पाच वेळा उंचावली आहे, तर चेन्नई सुपरकिंग्सने चार वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. हे दोन संघ स्पर्धेतील सर्वात तगडे मानले जातात. असं म्हटलं जायचं आयपीएल म्हणजे अशी स्पर्धा जिथे सर्व संघ मिळून मुंबई आणि चेन्नईसोबत प्लेऑफमध्ये लढण्यासाठी खेळत असतात. परंतु तो आता इतिहास आहे. दोन्ही संघाची सध्याची स्थिती त्यांच्या नावाला साजेशी नाही. दोन संघांची आयपीएल-2022 (IPL 2022) मधील आतापर्यंतची कामगिरी चांगली झालेली नाही.

रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने आतापर्यंत सहा सामने खेळले आहेत आणि हे सर्व सामने त्यांनी गमावले आहेत तर चेन्नईने सहापैकी केवळ एक सामना जिंकला आहे. दोन्ही संघ पॉईंट्स टेबलवर सर्वात तळाशी आहेत. चेन्नईचा संघ नवव्या क्रमांकावर आहे, तर मुंबई दहाव्या क्रमांकावर आहे. पॉईंट्स टेबलवर चेन्नईचे दोन गुण आहेत, तर मुंबईने अद्याप खाते उघडलेले नाही. रोहित शर्माचा संघ सध्या दबावाखाली असून संघाचा क्रिकेट संचालक झहीर खाननेही ही गोष्ट मान्य केली आहे.

MI vs CSK, IPL 2022: मुंबई विरुद्ध चेन्नई सामना कधी आणि कुठे पाहता येईल?

IPL 2022 मध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्समधील सामना कधी खेळवला जाणार आहे?

आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्समधील सामना 21 एप्रिलला म्हणजेच गुरुवारी खेळवला जाणार आहे.

IPL 2022 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जमधील सामना कुठे खेळवला जाईल?

आयपीएल 2022 मध्ये, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात नवी मुंबईतली डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर सामना खेळवला जाणार आहे.

आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामना कधी सुरू होईल?

आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यासाठी नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता खेळाला सुरुवात होईल.

आयपीएल 2022 मधील मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना कुठे पाहता येईल?

आयपीएल 2022 मधील मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये पाहता येईल.

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल?

डिस्ने+हॉटस्टार वर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जमधील सामन्याचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग सदस्यत्वासह पाहू शकता. याशिवाय tv9marathi.com वरही सामन्याचे लाईव्ह अपडेट्स आणि कव्हरेज वाचता येईल.

इतर बातम्या

IPL 2022, LSG vs RCB , Purple Cap : बँगलोरचा लखनौवर मोठा विजय, पर्पल कॅपच्या टेबलमध्ये कोण अव्वल?

IPL 2022, LSG vs RCB, Orange Cap : बँगलोरचा लखनौवर ‘रॉयल’ विजय, ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये कोण अव्वल?

LSG vs RCB IPL 2022: रवीना टंडनच्या अदांनी केलं घायाळ, KGF 2 ची टीम डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये