मुंबई: मागच्या महिन्यात झालेल्या मेगा ऑक्शनमुळे यंदा आयपीएलमधील (IPL Mega Auction) सर्वच संघांकडे नवीन खेळाडू आहेत. नव्या संघ बांधणीसह सर्व टीम्स मैदानात उतरणार आहेत. मुंबई इंडियन्सही (Mumbai Indians) याला अपवाद नाही. मुंबई इंडियन्सकडेही अनेक नवखे खेळाडू आहेत. ऑक्शनमध्ये दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डि कॉक आणि पांड्या बंधू दुसऱ्या टीम्सकडे गेले. पण रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव (Surya kumar yadav) आणि इशान किशन हे तीन हुकूमी एक्के मुंबईकडे आहेत. ऑक्शनमध्ये इशान किशनसाठी मुंबईने काय केलं, ते सर्वांनी पाहिलं. मुंबई इंडियन्सने अनमोलप्रीत सिंहला सलामीला पाठवयाचा ठरवलं, तर इशान किशन तिसऱ्या-चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. मागच्या सीजनमध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात अनमोलप्रीत सिंहला सलामीला पाठवण्याचा प्रयोग झाला होता. हाणामारीच्या षटकात पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर कायरन पोलार्ड आणि टिम डेविड मुंबई इंडियन्सकडे आहेत.
तीन परदेशी खेळाडूंचा पर्याय
डॅनियल सॅम्स किंवा फॅबियन एलन हे ऑलराऊंडर मुंबईकडे आहेत. बेबी एबी डेवाल्ड ब्रेविसही मुंबई इंडियन्सकडे आहे. अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये या बेबी एबीने आपला जलवा दाखवला होता. एबी डिविलियर्स सारखी तो फलंदाजी करतो, म्हणून त्याला बेबी एबी म्हणतात.
सूर्यकुमार तिसऱ्या मग चौथ्या नंबरवर कोण?
सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येणार असेल, तर चौथ्या नंबरवर कोण येणार? हा प्रश्न आहे. तिलक वर्माचा एक पर्याय मुंबईच्या टीमकडे आहे. हैदराबादच्या या खेळाडूने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली प्रतिभा दाखवून दिली आहे. किंवा अनमोलप्रीत सिंहचा दुसरा पर्याय आहे.
ट्रेंट बोल्ट नाही, मग पावरप्लेमध्ये दुसरा भेदक गोलंदाज कोण?
जसप्रीत बुमराह सोबत टायमल मिल्स मुंबईच्या गोलंदाजीची धुरा संभाळेल. जोफ्रा आर्चर तर या सीजनध्ये खेळत नाहीय. ट्रेंट बोल्टच्या अनुपस्थितीत पावरप्लेमध्ये दुसरा भेदक गोलंदाज कोणा आहे? याचा विचार मुंबईने केला पाहिजे. जसप्रीत बुमराह पावरप्लेमध्ये नेहमी एक षटक टाकतो. त्यामुळे डावखुरा वेगवान गोलंदाद जयदेव उनाडकटवर मोठी जबाबदारी असेल.
या विभागात मुंबई इंडियन्स कच खाणार
मधल्या षटकात मुंबईकडे दर्जेदार फिरकी गोलंदाज नाहीय. त्याची उणीव मुंबईला जाणवेल. मुरुगन अश्विन आणि मयंक मार्केडे हेच दोन भारतीय पर्याय मुंबई इंडियन्सकडे आहेत. एलन अष्टपैलू खेळाडू आहे. सुरुवातीचे सामने झाल्यानंतर दुसऱ्या फेजमध्ये मुंबईला दर्जेदार फिरकी गोलंदाजाची उणीव जाणवेल. त्यावेळी खेळपट्टीच स्वरुप बदलेलं असू शकतं. पीच फिरकी गोलंदाजांना साथ देईल. फक्त चार मैदानातच लीग स्टेजचे 70 सामने होणार आहेत.