IPL 2022 Orange Cap: जोस बटलरने इतिहास रचला, टॉप 5 मध्ये आता आणखी एका नवीन फलंदाजाचा समावेश
IPL 2022 Orange Cap: IPL मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप (Orange cap) दिली जाते. सध्या प्रत्येक सामन्यानंतर ऑरेंज कॅपसाठीच्या शर्यतीत टॉप 5 मध्ये एक नव्या खेळाडूचं नाव जोडलं जात आहे.
जोस बटलर ऑरेंज कॅपमध्ये पहिल्या स्थानी कायम
Image Credit source: rr twitter
Follow us on
मुंबई: IPL मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप (Orange cap) दिली जाते. सध्या प्रत्येक सामन्यानंतर ऑरेंज कॅपसाठीच्या शर्यतीत टॉप 5 मध्ये एक नव्या खेळाडूचं नाव जोडलं जात आहे. 7 मे रोजी काल कोलकाता नाइट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये सामना झाला. या लढतीत लखनौच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या क्विंटन डि कॉकचा (Quinton De Kock) आता ऑरेंज कॅपसाठीच्या टॉप 5 लिस्ट मध्ये समावेश झाला आहे. क्विंटन डि कॉकने कोलकाता विरुद्ध 50 धावांची अर्धशतकी खेळी केली.
सध्या ऑरेंज कॅपसाठीच्या टॉप 5 लिस्टमध्ये जोस बटलर आघाडीवर आहे. प्रत्येक सामन्यानंतर त्याच्या धावसंख्येत वाढ होत आहे.
7 मे रोजी पंजाब किंग्स विरुद्ध झालेल्या सामन्यानंतर तर जोस बटलरने इतिहास रचला.
क्विंटन डि कॉकने काल केकेआर विरुद्ध 29 चेंडूत 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. यात चार चौकार आणि तीन षटकार होते. या खेळीमुळे डि कॉक ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आता पाचव्या स्थानावर आहे.
हार्दिक पंड्या एक स्थान खाली गेला आहे.
़
डिकॉकच्या खात्यात एकूण 344 धावा आहेत. 11 सामन्यात त्याने 3 अर्धशतक झळकावली आहेत.
आयपीएलमध्ये आतापर्यंत 600 पेक्षा जास्त धावा अनेक फलंदाजांनी केल्या आहेत. जोस बटलर राजस्थान रॉयल्ससाठी अशी कामगिरी करणारा पहिला फलंदाज बनला आहे.
़
जोस बटलरच्या खात्यात 11 सान्यात एकूण 618 धावा आहेत. यात तीन शतक आणि तीन अर्धशतक आहेत. ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये तो पहिल्या स्थानावर आहे.
केएल राहुल 11 सामन्यात दोन शतकं आणि दोनअर्धशतकांसह 418 धावा काढून दुसऱ्या स्थानावर आहे.
शिखर धवन 11 सामन्यात 381 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. यात तीन अर्धशतक आहेत.
डेविड वॉर्नर 8 सामन्यात 356 धावांसह चौथ्या स्थानावर आहे. यात चार अर्धशतक आहेत.
क्विंटन डि कॉक 11 सामन्यात 344 धावांसह पाचव्या स्थानावर आहे. यात तीन अर्धशतक आहेत.