IPL 2022 Orange Cap: हार्दिकच्या कॅप्टन इनिंगमुळे केएल राहुलचं नुकसान, ऑरेंज कॅपच्या शर्यतीत कोण, कुठे? जाणून घ्या…

| Updated on: Apr 24, 2022 | 10:04 AM

IPL 2022 Orange Cap: पहिला सामना गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाइट रायडर्समध्ये झाला. गुजरातने हा सामना आठ धावांनी जिंकला. गुजरातच्या विजयात हार्दिक पंड्याने (Hardik pandya) महत्त्वाची भूमिका बजावली.

IPL 2022 Orange Cap: हार्दिकच्या कॅप्टन इनिंगमुळे केएल राहुलचं नुकसान, ऑरेंज कॅपच्या शर्यतीत कोण, कुठे? जाणून घ्या...
हार्दिक पांड्याची ऑरेंज कॅपच्या टेबलमध्ये आगेकूच
Image Credit source: IPL
Follow us on

मुंबई: यंदाच्या IPL 2022 च्या सीजनमध्ये दोन नवीन संघ आहेत. गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स. हे दोन्ही संघ चांगली कामगिरी करत आहेत. त्यात गुजरात टायटन्सची कामगिरी, तर उजवी आहे. या टीमने आयपीएलमध्ये डेब्यु केलाय, असं वाटतच नाहीय. पॉइंटस टेबलमध्ये गुजरात टायटन्सचा संघ सध्या अव्वल स्थानावर आहे. सात पैकी सहा सामन्यात गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) विजय मिळवला आहे, तर एकासामन्यात त्यांचा पराभव झालाय. आयपीएलमध्ये शनिवारी डबल हेडरचे सामने झाले. पहिला सामना गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाइट रायडर्समध्ये झाला. गुजरातने हा सामना आठ धावांनी जिंकला. गुजरातच्या विजयात हार्दिक पंड्याने (Hardik pandya) महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने कोलकाता विरुद्ध 67 धावांची खेळी केली. हार्दिक पंड्याने 49 चेंडूत 67 धावा करताना चार चौकार आणि दोन षटकार लगावले. या इनिंग नंतर हार्दिक पंड्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दाखल झालाय. त्याने टॉप-5 मध्ये प्रवेश केला आहे. याआधी तो पहिल्या दहामध्ये सुद्धा नव्हता.

तिसऱ्या नंबरवर कोण?

हार्दिक पंड्या या सीजनमध्ये सर्वाधिक धावा बनवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने लखनौ सुपर जायंट्सचा कॅप्टन के.एल.राहुलला हटवून हे स्थान मिळवलं आहे. हार्दिक पंड्याच्या सहा सामन्यात 295 धावा झाल्या आहेत. त्याने तीन अर्धशतक झळकावली आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत जोस बटलर पहिल्या स्थानावर आहे. त्याच्या जवळपासही कुणी नाहीय. बटलरने सात सामन्यात 491 धावा केल्या आहेत. यात तीन शतकी खेळी आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. केएल राहुल तिसऱ्या स्थानावर आहे. सात सामन्यात त्याच्या 265 धावा झाल्या आहेत.

श्रेयसने शिवम दुबेला टाकलं मागे

चेन्नई सुपर किंग्सच्या शिवम दुबेला केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यरने मागे टाकलं आहे. कालपर्यंत दुबे टॉप 5 मध्ये होता. पण हार्दिकच्या एंट्रीने तो टॉप 5 मधून बाहेर गेला आहे. श्रेयसनेही शिवम दुबेला मागे टाकलय. दुबेच्या सात सामन्यात 239 धावा झाल्या आहेत. तो सातव्या क्रमांकावर आहे. श्रेयसच्या आठ सामन्यात 248 धावा असून तो सहाव्या स्थानावर आहे.

SRH च्या अभिषेक शर्माचा फायदा

काल डबल हेडरमध्ये दुसरा सामना सनरायजर्स हैदराबाद आणि आरसीबीमध्ये होता. आरसीबीचा कॅप्टन फाफ डू प्लेसिस फक्त पाच धावा करु शकला. पण अजूनही तो टॉप 5 मध्ये आहे. डू प्लेसी चौथ्या स्थानावर आहे. आठ सामन्यात त्याने 255 धावा केल्या आहेत. पृथ्वी शॉ पाचव्या स्थानावर आहे. शॉ ने सात सामन्यात 254 धावा केल्या. हैदराबादने काल आरसीबीला नऊ विकेटने हरवलं. या सामन्यात अभिषेक शर्माने दमदार फलंदाजी केली. त्याने 28 चेंडूत 47 धावा फटकावल्या. आपल्या खेळीत त्याने आठ चौकार आणि एक षटकार लगावला. अभिषेक शर्मा 15 व्या स्थानावर आहे. सात सामन्यात त्याच्या 220 धावा झाल्या आहेत.