PBKS vs GT IPL 2022: राशिद खानने बाजी पलटवलेली पण Mumbai Indians च्या माजी खेळाडूने डाव उलटवला

| Updated on: Apr 08, 2022 | 10:01 PM

PBKS vs GT IPL 2022: पंजाबचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. पंजाबचा डाव सुरु असताना रोलरकोस्टर राईडचा अनुभव आला. कधी सामन्यात पंजाबचा संघ सरस वाटत होता, तर कधी गुजरात टायटन्सची गोलंदाजी भारी वाटली.

PBKS vs GT IPL 2022: राशिद खानने बाजी पलटवलेली पण Mumbai Indians च्या माजी खेळाडूने डाव उलटवला
पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई: ब्रेबॉर्न स्टेडियमवर पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्समध्ये (PBKS vs GT) आयपीएलचा 16 वा सामना सुरु आहे. गुजरात टायटन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्याने (Hardik pandya) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. पंजाबचा डाव सुरु असताना रोलरकोस्टर राईडचा अनुभव आला. कधी सामन्यात पंजाबचा संघ सरस वाटत होता, तर कधी गुजरात टायटन्सची गोलंदाजी भारी वाटली. पंजाबची सुरुवात चांगली झाली नाही. कॅप्टन मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) संघाची धावसंख्या 11 असताना स्वस्तात पाच धावांवर बाद झाला. जॉनी बेअरस्टोची दुसरी विकेटही लवकर गेली. पाच षटकात 34 धावात पंजाबचे दोन फलंदाज माघारी परतले होते. पण शिखर धवन आणि लियाम लिविंगस्टोनने डाव सावरला. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी झाली.

एका ओव्हरमध्ये 24 धावा

लिविंगस्टोनने चेन्नई विरुद्धच्या सामन्याप्रमाणे याही सामन्यात स्फोटक फलंदाजी केली. धवन आऊट झाल्यानंतर जितेश शर्मा फलंदाजीला आला. त्याने 11 चेंडूत 23 धावांची वेगवान खेळी केली. यात एक चौकार आणि दोन षटकार होते. गुजरात टायटन्सच्या राहुल तेवितयाचं 13 व षटक महागडं ठरलं आहे. या ओव्हरमध्ये जितेश शर्मा आणि लिविंगस्टोनने धावा लुटल्या. त्यांनी एका ओव्हरमध्ये 24 धावा वसूल केल्या. लिविंगस्टोनने सिक्स मारुन अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर गुजरातकडून डेब्यू करणाऱ्या दर्शन नालकंडेने लागोपाठच्या चेंडूंवर जितेश शर्मा आणि ओडियन स्मिथची विकेट काढली. त्यावेळी गुजरातचा संघ सामन्यावर पकड मिळवेल असं वाटलं.

राशिद खानच 16 वं षटक निर्णायक

पण लिविंगस्टोनची फटकेबाजी सुरुच होती. राशिद खानच 16 वं षटक निर्णायक ठरलं. त्याने लिविंगस्टोन आणि शाहरुख खान या दोन मोठ्या विकेट काढल्या. लिविंगस्टोनने 27 चेंडूत 64 धावा केल्या. त्यान सात चौकार आणि चार षटकार ठोकले. 153 ते 162 दरम्यान पंजाब किंग्सच्या चार विकेट गेल्या होत्या. गुजरातने कमबॅक केलं होतं. त्यांना पंजाबचा डाव झटपट गुंडाळण्याची संधी होती.

गुजरातच्या अपेक्षांवर पाणी फिरवलं

पण राहुल चाहर आणि अर्शदीप सिंहने गुजरातच्या अपेक्षांवर पाणी फिरवलं. शेवटच्या विकेटसाठी 27 धावांची महत्त्वाची भागीदारी झाली. गुजरात टायटन्सने सामन्यावर पकड बनवण्याची संधी गमावली. राहुल चाहरने नाबाद 22 आणि अर्शदीप सिंहने नाबाद 10 धावा केल्या. पंजाब किंग्सने गुजरात टायटन्सला विजयासाठी 190 धावांचे लक्ष्य दिले आहे.