मुंबई: आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतरचा सर्वात मोठा रोमांचक सामना काल मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर पहायला मिळाला. या मॅचमध्ये राहुल तेवतियाने (Rahul Tewatia) सलग दोन चेंडूंवर दोन षटकार ठोकून गुजरात टायटन्सला पंजाब किंग्स विरुद्घ (GT vs PBKS) विजय मिळवून दिला. गुजरातने हा सामना सहा विकेटने जिंकला. आयपीएलमध्ये डेब्यू करणाऱ्या गुजरात टायटन्सने सलग तीन विजय मिळवून पॉईंटस टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे. त्यांनी विजयाची हॅट्ट्रिक केली. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सचे सहा पॉईंट झाले आहेत. पॉईंटस टेबलमध्ये गुजरात टायटन्सचा संघ आता दुसऱ्या स्थानावर आहे. तेच पंजाब किंग्सच्या स्थानात घसरण झाली आहे. आयपीएलमधल्या प्रत्येक जय-पराजयासह पॉईंट टेबलमध्ये बदल होत जाणार आहेत. स्पर्धा जशी पुढे सरकेल, तसा प्रत्येक विजय-पराभव महत्त्वाचा ठरणार आहे.
शुक्रवारी पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारीत 20 षटकात 189 धावा केल्या. लियाम लिविंगस्टोनच्या 27 चेंडूतील 64 धावा महत्त्वपूर्ण ठरल्या. गुजरात टायटन्सकडून राशिद खानने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. त्यानंतर गुजरातकडून शुभमन गिलने सर्वाधिक 59 चेंडूत 96 धावा केल्या. अखेरच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 19 धावांची गरज होती. शेवटच्या दोन चेंडूत 12 धावांची गरज असताना राहुल तेवतियाने दोन षटकार ठोकून विजय मिळवून दिला.
संघ | सामने | जय | पराजय | पॉइंट्स | नेट रन रेट |
---|---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | 14 | 10 | 4 | 20 | 0.316 |
राजस्थान रॉयल्स | 14 | 9 | 5 | 18 | 0.298 |
लखनौ सुपर जायंट्स | 14 | 9 | 5 | 18 | 0.251 |
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर | 14 | 8 | 6 | 16 | -0.253 |
दिल्ली कॅपिटल्स | 14 | 7 | 7 | 14 | 0.204 |
पंजाब किंग्स | 14 | 7 | 7 | 14 | 0.126 |
कोलकाता नाइट रायडर्स | 14 | 6 | 8 | 12 | 0.146 |
सनरायजर्स हैदराबाद | 14 | 6 | 8 | 12 | -0.379 |
चेन्नई सुपर किंग्स | 14 | 4 | 10 | 8 | -0.203 |
मुंबई इंडियन्स | 14 | 4 | 10 | 8 | -0.506 |
तीन सामन्यात गुजरात टायटन्सचे सहा पॉईंट झाले आहेत. विजय मिळवण्याच्या बाबतीत त्यांनी कोलकाता नाइट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्सची बरोबरी केली आहे. नेट रनरेटमुळे कोलकाता अजूनही पहिल्या स्थानावर आहे. लखनौ सुपर जायंट्सचा NRR थोडा कमी असण्याचा फायदा गुजरात टायटन्सला झाला आहे. ते दुसऱ्या स्थानावर आहेत. राजस्थान रॉयल्सच्या स्थानात घसरण होऊन ते चौथ्या क्रमांकावर गेले आहेत.