मुंबई: बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला (IPL) शनिवारी सुरुवात झाली आहे. पहिल्या फेरीच्या पाच सामन्यात दहा संघ परस्परांना भिडले. चार दिवसात वेगवेगळे उत्कंठावर्धक सामने प्रेक्षकांना पहायला मिळाले. काल रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि कोलकाता नाइट रायडर्समध्ये (RCB vs KKR) सामना झाला. आयपीएलमधील दोन्ही संघांचा हा दुसरा सामना होता. पहिल्या सामन्यात कोलकाता विजयी ठरली होती, तर सलामीच्या सामन्यात RCB पंजाब किंग्सकडून पराभूत झाली होती. कालच्या सामन्यात RCB ने केकेआरचा पराभव करुन पहिल्या विजयाची नोंद केली. या सामन्यानंतर गुणतालिकेत काही बदल झाला आहे. पण अव्वल स्थानावर राजस्थानचाच (Rajasthan Royals) संघ कायम आहे. आतपर्यंत दोन वेळा दोन संघांनी दोनशे धावांचा टप्पा पार केला आहे.
कालच सामन्यात 129 धावांच्या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना बँगलोरची चांगलीच दमछाक झाली. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने अखेर विजयाचं खात उघडलं. टी-20 क्रिकेटचं स्वरुप बघता 128 ही तशी नीचांकी धावसंख्या. पण त्यांना विजयासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला. कॅप्टन फाफ डु प्लेसिस, विराट कोहली असे मोठे फलंदाज असलेल्या RCB ला कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांनी चांगलच सतावलं. आणखी 15-20 धावा कोलकात्याने केल्या असत्या, तर या सामन्याचा निकाल वेगळा लागला असता.
संघ | सामने | जय | पराजय | पॉइंट्स | नेट रन रेट |
---|---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | 14 | 10 | 4 | 20 | 0.316 |
राजस्थान रॉयल्स | 14 | 9 | 5 | 18 | 0.298 |
लखनौ सुपर जायंट्स | 14 | 9 | 5 | 18 | 0.251 |
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर | 14 | 8 | 6 | 16 | -0.253 |
दिल्ली कॅपिटल्स | 14 | 7 | 7 | 14 | 0.204 |
पंजाब किंग्स | 14 | 7 | 7 | 14 | 0.126 |
कोलकाता नाइट रायडर्स | 14 | 6 | 8 | 12 | 0.146 |
सनरायजर्स हैदराबाद | 14 | 6 | 8 | 12 | -0.379 |
चेन्नई सुपर किंग्स | 14 | 4 | 10 | 8 | -0.203 |
मुंबई इंडियन्स | 14 | 4 | 10 | 8 | -0.506 |
आतापर्यंत आक्रमक फलंदाजी बरोबर चौकार-षटकार प्रेक्षकांना पहायला मिळाले आहेत. फाफ डु प्लेसी, ओडिन स्मिथ आणि संजू सॅमसन यांच्या फलंदाजीने टी 20 क्रिकेटमधला खराखुरा आनंद प्रेक्षकांना अनुभवता आला. या तिघांनी जागेवरुनच खडेखडे सिक्सर मारले. संजू सॅमसमनने जी बॅटिंग केली, त्याला तोड नव्हती. त्याला रोखायचं कसं हाच प्रश्न सनरायजर्स हैदराबादच्या गोलंदाजांना पडला होता.
We’ve all got that first win feeling. ??
Have a great Thursday, 12th Man Army! ??@imVkohli @faf1307#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB pic.twitter.com/8y9nCptFlK
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) March 31, 2022
पहिल्या टप्प्यात कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्स, गुजरात टायन्स आणि राजस्थान रॉयल्स यांनी आपले सलामीचे सामने जिंकेल आहेत. सर्वच टीम्सच्या खात्यात दोन पॉइंटस जमा झाले आहेत. सर्वच संघांचे समान गुण असतात, त्यावेळी कुठला संघ कुठल्या स्थानावर रहाणार हे नेट रनरेटच्या आधारावर ठरतं.