बंगळुरु: नॅशनल क्रिकेट अकादमीत आज ऑलराऊंडर हार्दिक पंड्या (Hardik pandya) आणि सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) यांची फिटनेस टेस्ट पार पडली. हार्दिकच्या फिटनेसबद्दल विविध शंका-कुशंका व्यक्त होत असताना, त्याने ही चाचणी पास केली. पण पृथ्वी शॉ फिटनेस टेस्ट पास करण्यात अपयशी ठरला. कठीण समजली जाणारी यो-यो टेस्ट पृथ्वी शॉ पास करु शकला नाही. पृथ्वी फिटनेस टेस्ट पास करु शकला नसला, तरी तो आगामी इंडियन प्रिमीयर लीग स्पर्धेत (IPL) खेळू शकतो. आयपीएल स्पर्धा येत्या 26 मार्चपासून सुरु होत आहे. क्रिकेटपटूंच्या दुखापती आणि फिटनेस तपासण्यासाठी BCCI ने कॅम्प आयोजित केला होता. पृथ्वी शॉ अन्य क्रिकेटपटूंप्रमाणे या कॅम्पध्ये सहभागी झाला होता. सध्याच्या घडीला पृथ्वी शॉ सेंट्रल कॉन्ट्रॅक्चा भाग नाहीय. पण त्याच्या फिटनेसबद्दल जाणून घेण्यासाठी त्याला NCA मध्ये बोलावण्यात आले होते.
आयपीएल खेळू शकतो?
सेंट्रल कॉन्ट्रॅक्टचा भाग असलेल्या क्रिकेटपटूंना फिटनेस टेस्ट देणे बंधनकारक आहे. पृथ्वी शॉ च्या फिटनेस टेस्टचा रिझल्ट समाधानकारक नाहीय. यो-यो टेस्ट पास होण्यासाठी 16 गुण आवश्यक आहेत. पण पृथ्वी शॉ ला 15 गुण मिळवता आले.
रणजीमध्ये काय कामगिरी आहे?
“ही फक्त फिटनेस अपडेट होती. या टेस्टमुळे पृथ्वीला दिल्ली कॅपिटल्सकडून खेळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. हा फक्त फिटनेसचा एक निकष आहे. ही चाचणी म्हणजे सर्व आहे, असं काही नाही आणि शेवटही नाही” असे BCCI सूत्रांनी सांगितले. पृथ्वी शॉ मुंबईच्या रणजी संघाचा भाग आहे. तो तीन सामने खेळला. पण त्याला प्रभावी कामगिरी करता आली नाही. चार डावात त्याने फक्त 26.75 च्या सरासरीने 107 धावा केल्या.
हार्दिकसाठी कशी होती यो-यो टेस्ट
इंडियन प्रीमियर लीग 2022 स्पर्धा सुरु होण्याआधी गुजरात टायटन्स संघासाठी एक चांगली बातमी आहे. गुजरात टायटन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्याने फिटनेस टेस्ट पास केली आहे. ऑलराऊंडर हार्दिक पंड्याने कठीण समजली जाणारी यो-यो टेस्ट पास केली आहे. बंगळुरु स्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत हार्दिकची ही चाचणी झाली. फिटनेस टेस्ट पास झाल्यामुळे हार्दिकचा आयपीएल 2022 स्पर्धेत खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.