मुंबई: इंडियन प्रिमीयर लीगचा 15 वा सीजन संपला असून आता Prize Money ची चर्चा सुरु झाली आहे. आयपीएलचं विजेतेपद मिळवणाऱ्या गुजरात टायटन्सच्या (Gujarat Titans) हाती जणू कुबेराचा खजिना लागला आहे. पराभूत होणाऱ्या राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) सुद्धा कोट्यवधीची कमाई केली आहे. प्लेऑफमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर राहिलेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन संघांनीही घसघशीत कमाई केली आहे. टॉपमधल्या पहिल्या चार संघांवर पैशांचा पाऊस पडला. काल 29 मे रोजी गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला सात विकेटने नमवून आयपीएलचं विजेतेपद मिळवलं. आयपीएलला एक नवीन चॅम्पियन मिळाला आहे.
आयपीएल 2022 मध्ये फक्त संघांनाच पैसा मिळाला नाही, तर खेळाडुंनी सुद्धा चांगला कमाई केली. गुजरात आणि राजस्थानमधील फायनल संपल्यानंतर खेळाडूंना इनामी रक्कमेने सन्मानित करण्यात आले. खेळाडूंना मिळालेल्या बक्षिसाची रक्कम लाखोंमध्ये आहे. फायनल झाल्यानंतर संघ आणि खेळाडूंना बक्षिसापोटी किती रक्कम मिळाली, ते जाणून घेऊया.
आयपीएल 2022 ची चॅम्पिशिप जिंकणाऱ्या गुजरात टायटन्सला इनामापोटी 20 कोटीची रक्कम मिळाली. उपविजेतेपद मिळवणाऱ्या राजस्थान रॉयल्सला 13 कोटी रुपये मिळाले. तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला 7 कोटी रुपये आणि लखनौ सुपर जायंट्सला इनामापोटी 6.50 कोटी मिळाले.
आयपीएल 2022 मध्ये संघांप्रमाणेच खेळाडूंवरही पैसा बरसला. चांगलं प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंनी लाखोंची कमाई केली.
विजेते – गुजरात टायटन्स – 20 कोटी
उप विजेते – राजस्थान रॉयल्स – 13 कोटी
तिसरं स्थान – रॉयल चॅलेंजर्स बँगलोर – 7 कोटी
चौथं स्थान – लखनौ सुपर जायंट्स – 6.50 कोटी
ऑरेंज कॅप – जोस बटलर – 863 धावा – 10 लाख रुपये
पर्पल कॅप – युजवेंद्र चहल – 27 विकेट – 10 लाख रुपये
IPL इमर्जिंग प्लेयर ऑफ द टुर्नामेंट – उमरान मलिक – 10 लाख रुपये
मॅक्सिमम सिक्सर पुरस्कार – जोस बटलर – 10 लाख रुपये
गेम चेंजर ऑफ सीजन – जोस बटलर – 10 लाख रुपये
आयपीएलमधील वेगवान चेंडू – लॉकी फर्ग्युसन – 10 लाख रुपये
सुपर स्ट्राइकर ऑफ द सीजन – दिनेश कार्तिक – टाटा पंच कार
कॅच ऑफ द सीजन – इविन लुइस – 10 लाख रुपये