चेन्नई: आयपीएल 2022 (IPL 2022) च्या ऑक्शनमध्ये खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांचा पाऊस पडला. आता लवकरच ते सर्व खेळाडू मैदानावर टॅलेंट दाखवताना दिसतील. आयपीएलच्या 15 व्या सीजनमध्ये 10 संघ मैदानावर खेळताना दिसणार आहेत. 26 मार्चपासून यंदा आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यंदा आयपीएलचे सामने मुंबई, (Mumbai) पुण्यात होणार असून प्रेक्षकांनाही मैदानावर परवानगी देण्यात आली आहे. आयपीएलच्या नव्या सीजनला सुरुवात होण्याआधी स्पर्धेचा प्रोमो रिलीज झाला आहे. नेहमीप्रमाणे एमएस धोनी (MS dhoni) एका वेगळ्या लूकमध्ये दिसतोय. यावेळी धोनी बस ड्रायव्हर बनला आहे. धोनीचा हा दक्षिण भारतीय लूक आहे. नेहमीप्रमाणे यंदाही आयपीएलचा प्रोमो खूपच जबरदस्त झाला आहे.
धोनी बस का थांबवतो?
आयपीएल 2022 च्या प्रोमोमध्ये धोनी बस चालवताना दिसतोय. अचानक रस्त्याच्या मध्ये धोनी ब्रेक मारतो व त्यानंतर रिवर्स गीयरमध्ये बस मागे घेतो. संपूर्ण ट्रॅफिक थांबत व बस सोबत मागे जातं. त्यानंतर धोनी मध्ये रस्त्यातच बस बंद करतो व ड्राइव्हिंग सीटवरुन उतरुन बसच्या पायऱ्यांवर बसतो. बसमध्ये रस्त्यातच थांबवल्याने वाहतूक पोलीस अधिकारी धोनीला असं करण्याचं कारण विचारतो. त्यावेळी धोनीच्या उत्तरातून संपूर्ण विषय समजतो. “सुपरओव्हर चालू आहे. टाटा आयपीएल आहे. हा वेडेपणा आता सामान्य आहे” असं धोनी व्हिडिओत बोलताना दिसतो.
When it’s the #TATAIPL, fans can go to any extent to catch the action – kyunki #YehAbNormalHai!
What are you expecting from the new season?@StarSportsIndia | @disneyplus pic.twitter.com/WPMZrbQ9sd
— IndianPremierLeague (@IPL) March 4, 2022
दोन वेगळया फॉर्मेटमध्ये स्पर्धा
आयपीएल स्पर्धा यंदा वेगळ्या फॉर्मेटमध्ये खेळली जाणार आहे. 10 टीम्सची दोन ग्रुपमध्ये विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या गटात मुंबई, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, केकेआर आणि लखनऊ सुपर जायंट्स या टीम्स आहेत. दुसऱ्या गटात सीएसके, एसआरएच आरसीबी, पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स या टीम्स आहेत.