IPL 2022: मागच्या सीजनमध्ये विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचं (RCB) कर्णधारपद सोडलं. तेव्हापासून बंगलोरचा पुढचा कर्णधार कोण होणार? याविषयी तर्क-वितर्क सुरु झाले होते. अखेर काल RCB ने कॅप्टनच्या नावाची घोषणा केली. दक्षिण आफ्रिकेचा फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis) विराट कोहलीचा (Virat kohli) उत्तराधिकारी असणार आहे. आरसीबीने काल कॅप्टन म्हणून त्याचं नाव जाहीर केलं. यंदाच्या 15 व्या सीजनमध्ये तो आरसीबीचं नेतृत्व संभाळणार आहे. आरसीबीच्या कॅप्टनशिपसाठी त्याचचं नाव आघाडीवर होतं. आरसीबीचं कॅप्टन म्हणून फाफ डू प्लेसिसच्या नावाची घोषणा का केली? त्यामागचं कारण रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाचे संचालक माइक हेसन यांनी उलगडून सांगितला. फाफ डू प्लेसिसला मागच्या महिन्यात मेगा ऑक्शनमध्ये आरसीबीने विकत घेतलं. कर्णधारपदासाठी तो एक योग्य उमेदवार होता. त्यामुळे त्याचं नाव चर्चेत होतं.
दोघांकडून होती स्पर्धा
कर्णधारपदासाठी त्याला ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल आणि भारताचा विकेटकिपर फलंदाज दिनेश कार्तिककडून स्पर्धा होती. मॅक्सवेलला आरसीबीने रिटेन केलं, तर कार्तिकला ऑक्शनमध्ये 5.5 कोटी रुपयांना विकत घेतलं. कॅप्टनशिपचा विचार करुन फाफ डू प्लेसिसवर बोली लावली का? त्या प्रश्नावर माइक हेसन यांनी तो सुद्धा विचार डोक्यात होता, असं उत्तर दिलं.
फ्रेंचायजी भारतीय कॅप्टनला जास्त प्राधान्य का देतात?
“फाफ डू प्लेसिसला विकत घेताना फलंदाजी बरोबर कॅप्टनशिपचा विचारही आमच्या डोक्यात होता. आमच्याकडे विराट आणि मॅक्सवेल दोघेही आहेत, ज्यांच्याकडे कॅप्टनशिपचा दीर्घ अनुभव आहे. नेतृत्व क्षमतेचा विस्तार हा सुद्धा आम्ही विचार केला” असे माइक हेसन म्हणाले. फ्रेंचायजी कॅप्टनशिपच्या मुद्यावर भारतीय खेळाडूंना जास्त पसंती देतात. आयपीएलच्या नियमानुसार एकासंघातून चार परदेशी खेळाडू खेळू शकतात. डू प्लेसिस प्रत्येक सामन्यासाठी उपलब्ध असेल, असा विश्वास हेसन यांनी व्यक्त केला.
आमच्या मनात कुठलीही शंका नाही
“फाफ प्रत्येक सामना खेळू शकतो. त्यामुळे तो प्रश्न नाहीय. ग्रुपमधल्या दुसऱ्या लीडर्ससोबत काम करणारा, युवा खेळाडूंकडून उत्तम कामगिरी करुन घेणारा कॅप्टन आम्हाला हवा होता” असे हेसन यांनी सांगितलं. “आम्हाला कॅप्टन म्हणून उत्तम उमेदवार हवा होता. फाफ त्यासाठी योग्य उमेदवार आहे, या बद्दल आमच्या मनात कुठलीही शंका नाही” असं हेसन यांनी सांगितलं. फाफ डू प्लेसिसकडे दक्षिण आफ्रिकेचं कर्णधारपद भुषवण्याचा अनुभव आहे. त्याशिवाय त्यांनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना नेहमीच सातत्यपूर्ण प्रदर्शन केलं आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला त्याच्याकडून भरपूर अपेक्षा आहे.