Delhi capitals IPL 2022: रिकी पॉन्टिंगकडून अशी अपेक्षा नव्हती, हॉटेलच्या रुममध्ये केली तोडफोड

| Updated on: Apr 27, 2022 | 3:53 PM

Delhi capitals IPL 2022: "तुम्ही डगआउटमध्ये असताना, जेव्हा असं काही घडतं, परिस्थिती तुमच्या नियंत्रणाबाहेर असते, ती वेळ खूप कठीण असते. मैदानऐवजी त्यावेळी तुम्ही खोलीत बंद असाल, तर परिस्थिती आणखींनच अडचणीची असते"

Delhi capitals IPL 2022: रिकी पॉन्टिंगकडून अशी अपेक्षा नव्हती, हॉटेलच्या रुममध्ये केली तोडफोड
Delhi capitals Head coach Ricky ponting
Image Credit source: BCCI/IPL
Follow us on

मुंबई: दिल्ली कॅपिटल्सचे हेड कोच रिकी पॉन्टिंग (Ricky ponting) यांनी क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला आहे. आता ते संघासोबत आहेत. पॉन्टिंगच्या कुटुंबातील सदस्याला कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे त्यांना क्वारंटाइनमध्ये रहावे लागले. पॉन्टिंग क्वारंटाइनमध्ये असताना दिल्ली कॅपिटल्सचा राजस्थान रॉयल्स (DC vs RR) बरोबर सामना झाला. हा सामना खेळापेक्षा वादामुळे जास्त गाजला. शेवटच्या ओव्हरमध्ये नो बॉल वरुन वाद सुरु झाला. कॅप्टन ऋषभ पंतने (Rishabh Pant) रोव्हमॅन पॉवेल आणि कुलदीप यादव या दोघांना माघारी डगआउटमध्ये बोलावले होते. या संपूर्ण वादामुळे ऋषभ, शार्दुल ठाकूर आणि सहाय्यक कोच प्रवीण आमरे यांच्यावर कारवाई करण्यात आली. पॉन्टिंग त्यावेळी हॉटेलच्या रुममधून सामना पाहत होता. दिल्लीचा पराभव झाल्यानंतर पॉन्टिंग यांचा पारा चढला. त्यांनी हॉटेलच्या रुममध्येच तोडफोड केली.

त्या सामन्याने खूप त्रास दिला

“त्या सामन्याने खूप त्रास दिला. मी तीन ते चार रिमोट कंट्रोल्सची तोडफोड केली. काही पाण्याच्या बॉटल्स भिंतीवर फेकून मारल्या. तुम्ही डगआउटमध्ये असताना, जेव्हा असं काही घडतं, परिस्थिती तुमच्या नियंत्रणाबाहेर असते, ती वेळ खूप कठीण असते. मैदानऐवजी त्यावेळी तुम्ही खोलीत बंद असाल, तर परिस्थिती आणखींनच अडचणीची असते” असे पॉन्टिंग म्हणाले. दिल्ली कॅपिटल्सच्या टीमसाठी हा सीजन फारसा चमकदार राहिलेला नाही. त्यांनी आतापर्यंत सात सामने खेळले आहेत. चार सामन्यात त्यांचा पराभव झालाय. सहा पॉइंटससह ही टीम गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे.

आम्हाला तेच कारयचं आहे, जे….

“मी अनेकदा बोललोय, 36-37 षटकं चांगला खेळ होतो, उर्वरित तीन-चार ओव्हर्समध्ये सामना गमावतो. या दोन-तीन ओव्हर्समुळे फरक पडतो. आम्हाला सकारात्मक विचार करण्याची गरज आहे. आम्ही इथून पुनरागमनाचा जितका जास्त प्रयत्न करु, तितकी परिस्थिती आमच्यासाठी कठीण होईल. आम्हाला तेच कारयचं आहे, जे आतापर्यंत करत आलोय. निकाल आमच्या बाजूने लागेल” असं पॉन्टिंग म्हणाले.