मुंबई: दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये (DC vs RR) काल झालेला सामना वादांमुळे गाजला. दिल्लीच्या काही खेळाडूंनी नो-बॉलसाठी मैदानावरील अंपायर बरोबर हुज्जत घातली. कॅप्टन ऋषभ पंतने, (Rishabh Pant) तर खेळाडूंना माघारी बोलवण्यापर्यंत टोकाची भूमिका घेतली होती. अखेर दिल्लीच्या काही खेळाडूंना या वादाची किंमत चुकवावी लागली आहे. कॅप्टन ऋषभ पंत, वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आणि सहाय्यक कोच प्रवीण आमरे यांना इंडियन प्रीमियर लीगच्या अचारसंहितेच उल्लंघन केल्या प्रकरणी दोषी ठरण्यात आलय. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आलीय. ऋषभ पंतची मॅच फी मधली 100 टक्के रक्कम कापण्यात येणार आहे. ठाकूरची 50 टक्के तर प्रवीण आमरे यांचीही मॅच फी मधली 100 टक्के रक्कम कापण्यात येईल. त्याशिवाय त्यांच्यावर एक मॅचची बंदीही घालण्यात आलीय. आयपीएलने शनिवारी याबद्दल एक पत्रक जारी करुन माहिती दिली.
शेवटच्या षटकात दिल्लीता विजयासाठी 36 धावांची आवश्यकता होती. राजस्थान रॉयल्सकडून ओबेड मेकॉय गोलंदाजी करत होता. समोर दिल्ली कॅपिटल्सचा रोव्हमॅन पॉवेल फलंदाजी करत होता. पॉवेलने आपल्या फलंदाजीने हा सामना रोमांचक वळणावर नेऊन ठेवला. त्याने पहिल्या दोन चेंडूंवर षटकार ठोकले. तिसऱ्या चेंडूवरही त्याने षटकार ठोकला. पण खऱ्या वादाची सुरुवात इथेच झाली. चेंडू फुलटॉस होता. पॉवेलने चेंडूला थेट सीमारेषेपार पाठवलं. दिल्लीच्या टीमच्या मते हा नो बॉल होता. पण मैदानावरील पंचांनी नो बॉल दिला नाही.
ऋषभ पंतने यावरुन मैदानावरील पंचांसोबत वाद घातला. शार्दुल ठाकूर आणि प्रवीण आमरे तर थेट मैदानात आले. त्यांनी पंचांशी वाद घातला. आयपीएल नियमांमुसार पंतने अनुच्छेद 2.7 अंतर्गत लेवल-2 चा नियम मोडला. शार्दुल ठाकूरनेही अनुच्छेद 2.8 अंतर्गत लेवल-2 चा नियम मोडला. प्रवीण आमरे यांनी अनुच्छेद 2.2 अंतर्गत लेवल-2 चा नियम मोडला. या तिघांनी आपली चूक मान्य करुन शिक्षाही स्वीकारली.
#RishabhPant ???
Whole incident on umpiring…..#DCvsRR #DCvRR #RRvsDC #RRvDC #IPL2022 #IPL #umpire #noball #Shardulthakur #SanjuSamson #umpiring #Cheater @RishabhPant17 @IamSanjuSamson #DelhiCapitals #shanewatson #rovmanpowell @tanay_chawda1 @Cricketracker #JosButler pic.twitter.com/NRYdlMxrZk
— Anmol Narang (@Anmol_Narang_) April 22, 2022
दिल्ली हा सामना जिंकू शकली नाही. राजस्थानने त्यांना 15 धावांनी हरवलं. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना जोस बटलरच्या 116 धावांच्या बळावर 20 षटकात दोन विकेट गमावून 222 धावा केल्या. दिल्लीच्या संघाने जोरदार प्रयत्न केले. पण त्यांना 207 धावाच करता आल्या.