मुंबई: IPL 2022 मध्ये काल राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्सवर (RR vs LSG) विजय मिळवला. प्लेऑफच्या दृष्टीने विजय दोन्ही संघांसाठी आवश्यक होता. पण राजस्थानने बाजी मारली. पॉइंट्स टेबलमध्ये राजस्थानचा संघ आता दुसऱ्या स्थानावर आहे. राजस्थानने हा सामना जिंकला असला, तरी रियान पराग (Riyan parag) मात्र मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला आहे. रियान परागने मैदानावर जी कृती केली, त्या नाटकाची काय गरज होती? असा प्रश्न क्रिकेट प्रेमींना पडला आहे. फक्त क्रिकेट चाहतेच नव्हे, मैदानावर कॉमेंट्री करणारे कॉमेंट्रेटस, सोशल मीडियावरही रियानवर बरीच टीका करण्यात आली. लखनौच्या डावात 20 वी ओव्हर सुरु असताना हा प्रकार घडला. प्रसिद्ध कृष्णाच्या षटकात दुसऱ्या चेंडूवर रियानने जे केलं, त्याची काही गरज नव्हती.
प्रसिद्ध कृष्णाने लखनौच्या मार्कस स्टॉयनिसला चेंडू टाकला. स्टॉयनिसने फटका खेळल्यानंतर चेंडू हवेत उंच उडाला. रियान परागने झेल घेण्यात कुठलीही चूक केली नाही. पण त्यानंतर मनातला राग दाखवण्यासाठी त्याने चेंडू मैदानावर घासला, त्यावरुन सर्व वाद निर्माण झाला. सोशल मीडियाने रियान परागच्या या कृतीचा खास समाचार घेतला. काहींनी रियान परागला मूर्ख म्हटलं. काहींनी त्याला आयपीएलमधून हटवण्याची मागणी केली.
— ChaiBiscuit (@Biscuit8Chai) May 16, 2022
Riyan Parag, the cricketer with the worst attitude I’ve ever seen!!
— Avinash Sai (@saiavinash160) May 15, 2022
रियान परागच्या कृतीने फक्त क्रिकेट प्रेमीच नाही, तर कॉमेंट्री करणारे परदेशी क्रिकेटपटूही चिडले. “क्रिकेट एक मोठा खेळ असून प्रत्येकाच्या आठवणी या खेळाशी जोडलेल्या आहेत. नशिबाला कधी आव्हान देऊ नये” अंस मॅथ्यू हेडन कॉमेंट्री करताना म्हणाले. ‘भविष्यात याचा निर्णय होईल’ असं वेस्ट इंडिजचे इयन बिशप म्हणाले. याच सीजनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्धच्या सामन्यातही रियान पराग वादाच्या केंद्रस्थानी होती. बँगलोरचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल रियान परागच्या अंगावर धावून गेला होता. पण राजस्थान एका खेळाडूने मध्यस्थी करत हर्षलला थांबवलं व वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.