IPL 2022: हे सोप नाहीय, Shikhar dhawan ने या बॉलवर चौकार बनवला, एकदा हा VIDEO बघा, CSK विरोधात तुफान बॅटिंग

| Updated on: Apr 25, 2022 | 10:12 PM

IPL 2022: पंजाब किंग्सने धीमी सुरुवात केली होती. पण हळूहळू शिखर रंगात आला व त्याने चौफेर फटकेबाजी केली. त्याने मधल्या ओव्हर्समध्ये वेगाने धावा जमवल्या.

IPL 2022: हे सोप नाहीय, Shikhar dhawan ने या बॉलवर चौकार बनवला, एकदा हा VIDEO बघा, CSK विरोधात तुफान बॅटिंग
शिखर धवन
Image Credit source: IPL
Follow us on

मुंबई: IPL च्या पीचवर फक्त जोस बटलर, हार्दिक पंड्या आणि केएल राहुलच (KL Rahul) नाही, तर शिखर धवनची (Shikhar Dhawan) सुद्धा बॅट तळपली आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्सचा हा ओपनर आज आपल्या खऱ्या फॉर्ममध्ये दिसला. शिखर धवन म्हणजे गब्बरने आज CSK च्या प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला. जो गोलंदाज समोर आला, त्याची धवनने धुलाई केली. शिखर धवनने आज 59 चेंडूत नाबाद 88 धावा केल्या. यात 9 चौकार आणि दोन षटकार होते. या खेळीमुळे शिखर धवन आता ऑरेंज कॅपच्या शर्यतीत दाखल झाला आहे. चेन्नई विरुद्ध तुफानी इनिंग खेळून शिखर IPL 2022 मध्ये सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज बनला आहे.

दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी

चेन्नईला पंजाब विरुद्ध पावरप्लेमध्ये पहिलं यश मिळालं होतं. कॅप्टन मयंक अग्रवाल 40 धावा होण्यापूर्वीच डगआऊट एरियामध्ये परतला होता. पण शिखर धवनने भानुका राजपक्षेच्या साथीने डाव सावरला. पंजाब किंग्सने धीमी सुरुवात केली होती. पण हळूहळू शिखर रंगात आला व त्याने चौफेर फटकेबाजी केली. त्याने मधल्या ओव्हर्समध्ये वेगाने धावा जमवल्या. सामन्याच्या अखेरीस लियाम लिव्हिंगस्टोनने 19 धावांची छोटी पण स्फोटक खेळी केली. त्यामुळे पंजाब किंग्सला 187 पर्यंत पोहोचता आले. शिखरने राजपक्षे बरोबर दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.

हे सोप नाहीय, शिखर धवनने या बॉलवर चौकार बनवला इथे क्लिक करुन पहा VIDEO

लाजबाव स्कूपचा चौकारही बनवला

शिखर धवनने आज सुंदर फलंदाजी केली. त्याने मुकेश चौधरीच्या गोलंदाजीवर एक लाजबाव स्कूपचा चौकारही बनवला. इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत शिखर धवनने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात शिखरने आज 6 हजार धावा पूर्ण केल्या. विराट कोहली नंतर IPL मध्ये अशी कामगिरी करणारा तो दुसरा फलंदाज आहे.