IPL 2022: Shreyas iyer ला KKR च्या कॅप्टनशिपवरुन हटवणार?, थेट CEO चं नाव घेतलं

| Updated on: May 10, 2022 | 12:06 PM

IPL 2022: कोलकाताच्या गोलंदाजांनी मुंबई इंडियन्सचा डाव 17.3 षटकात 113 धावात आटोपला. 52 धावांनी मोठा विजय मिळवून केकेआरने आपल्या प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.

IPL 2022: Shreyas iyer ला KKR च्या कॅप्टनशिपवरुन हटवणार?, थेट CEO चं नाव घेतलं
KKR Captain Shreyas iyer
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई: नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर काल कोलकाता नाइट रायडर्स आणि मुंबई इंडियन्समध्ये (KKR vs MI) सामना झाला. कोलकातासाठी हा सामना ‘करो या मरो’ होता. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून रहाण्यासाठी कोलकाताला या सामन्यात विजय आवश्यक होता. मुंबई इंडियन्सकडून काल जसप्रीत बुमराहने (Jasprit bumrah) भेदक गोलंदाजीच प्रदर्शन केलं. त्याने चार षटकात 10 धावा देत 5 विकेट घेतल्या. त्याच्या गोलंदाजीनेच कोलकाताला निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 165 धावांवर रोखलं. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) सामना जिंकेल, असं वाटत होतं. पण केकेआरच्या गोलंदाजांनी कमाल केली. त्यांनी मुंबई इंडियन्सवर 52 धावांनी मोठा विजय मिळवला. या सीजनमध्ये कोलकाताकडून मुंबई इंडियन्सचा संघ दुसऱ्यांदा पराभूत झाला.

श्रेयस जे बोलून गेला, ते धक्कादायक

कोलकाताच्या गोलंदाजांनी मुंबई इंडियन्सचा डाव 17.3 षटकात 113 धावात आटोपला. 52 धावांनी मोठा विजय मिळवून केकेआरने आपल्या प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. सामना संपल्यानंतर केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यरला खेळाडूंना वगळण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने धक्कादायक खुलासा केला. सामन्याआधी होणाऱ्या टीम मीटिंगमधली मोठी गोष्ट त्याने उघड केली. खरंतर श्रेयस जे बोलून गेला, ते धक्कादायक आहे. केकेआरच्या संघात सर्वकाही आलबेल नसल्याचे ते संकेत आहेत.

वेंकी मैसूर यांचं काम काय?

संघाच्या निवड प्रक्रियेत टीमचे CEO वेंकी मैसूर सहभागी असतात, असं त्याने सांगितलं. “संघातून तुम्हाला वगळण्यात येतय, हे खेळाडूंना सांगण खूप कठीण असतं. टीमचे कोच आणि CEO सुद्धा संघ निवडीमध्ये सहभागी असतात. प्रत्येक खेळाडूने हा निर्णय योग्य प्रकारे स्वीकारला. प्रत्येक खेळाडूने मैदानात सर्वोत्तम प्रयत्न केले” असं श्रेयस म्हणाला.

श्रेयसने टीम मॅनेजमेंटशी पंगा तर घेतला नाही ना?

टीम निवडीमध्ये कोचचा रोल महत्त्वाच असतो. पण CEO चं काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे. आतली गोष्ट बाहेर सांगून, श्रेयसने टीम मॅनेजमेंटशी पंगा तर घेतला नाही ना? अशी चर्चा दबाक्या आवाजात सुरु झाली आहे. श्रेयसला या सीजननंतर कॅप्टनशिपवरुन हटवणार, असे टि्वटस काही युजर्सनी केले आहेत. यंदाच्या सीजनमध्ये केकेआरची कामगिरी विशेष राहिलेली नाही. गुणतालिकेत केकेआरची टीम सातव्या स्थानावर आहे. 12 सामन्यात त्यांनी पाच विजय मिळवले आहेत. केकेआरने त्यांचे उर्वरित 2 सामने जिंकले, तरी प्लेऑफसाठी त्यांनी इतर संघांच्या समीकरणावर अवलंबून रहावं लागणार आहे. केकेआरचे 10 पॉइंटस झाले आहेत. मेगा ऑक्शनमध्ये KKR ने 12 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मोजून श्रेयस अय्यरला विकत घेतलं होतं.