मुंबई: गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) सलामीवीर शुभमन गिलने (Shubman Gill) आयपीएलच 2022 च्या दुसऱ्या सामन्यात शानदार अर्धशतक झळकावलं. आज पुण्यात महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर सामना सुरु आहे. शुभमन गिलने क्लासिक बॅटिंग दाखवली. त्याने 46 चेंडूत 84 धावा फटकावल्या. दिल्लीच्या गोलंदाजांवर त्याने हल्लाबोल केला. हाणामारीच्या षटकात धावांची गती वाढवताना खलील अहमदने त्याचा विकेट काढला. गिलने 46 चेंडूत 84 धावा फटकावल्या. आयपीएलमधील (IPL) त्याची ही सर्वाधिक धावसंख्या आहे. त्याने 48 धावा तर फक्त दहा चेंडूतच केल्या. कोलकाता नाइट रायडर्सकडून गिल चार सीजन खेळला. पण गुजरातकडून खेळताना पहिल्या सामन्यात तो अपयशी ठरला होता. पहिल्याच षटकात त्याची विकेट गेली होती. आज गिलने मागचं अपयश धुवून काढलं.
गिलने आज धावांचा पाऊस पाडला. मॅथ्यू वेड, विजय शंकर हे गुजरातचे फलंदाज विशेष चमक दाखवू शकले नाहीत. पण त्याने गिलला फरक पडला नाही. त्याने दिल्लीच्या प्रत्येक गोलंदाजाला लक्ष्य केलं. 2018 मध्ये डेब्यु करणाऱ्या शुभमन गिलचा हा पाचवा सीजन आहे.
5⃣0⃣ for Gill. Aapka din Shub rahe! ?#GTvDC | #AavaDe | #TATAIPL | #SeasonOfFirsts pic.twitter.com/rVtixFA62b
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 2, 2022
दिल्लीचा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल विरोधात गिलने खासकरुन आक्रमण केलं. त्याच्या गोलंदाजीवर गिलने तीन षटकार ठोकले. शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव आणि खलील अहमदलाही त्याने सोडलं नाही. शुभमन गिलने 32 चेंडूत आयपीएलमधील 11 वं अर्धशतक पूर्ण केलं.