मुंबई: यंदाच्या आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादच्या (Sunrisers hyderabad) एका युवा वेगवान गोलंदाजाने अनेकांना प्रभावित केलं आहे. त्यांची भेदक गोलंदाजी पाहून, तो लवकरच भारतीय संघातून खेळेल, असं भाकीत क्रिकेट तज्ज्ञांनी वर्तवलं आहे. उमरान मलिक (Umran Malik) असं या युवा गोलंदाजाचं नाव आहे. 22 वर्षांचा उमरान मलिक मूळचा जम्मू-काश्मीरचा आहे. काल गुजरात जायंट्स (Gujarat Giants) विरुद्धच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा कॅप्टन केन विलियमसनने सातव्या षटकात चेंडू उमरानच्या हाती सोपवला. समोर टीम इंडियाचा ऑलराऊंडर आणि गुजरात टायटन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्या फलंदाजी करत होता. उमरानने षटकातील पहिलाच चेंडू बाऊन्सर टाकला. उमरानचा बाऊन्सर हार्दिकच्या हेल्मेटवर जाऊन आदळला. क्षणभर सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. पण हार्दिकने लगेच स्वत:ला सावरत पुन्हा फलंदाजी सुरु केली.
उमरानने डी.वाय.पाटील स्टेडियमवर आयपीएल 2022 मधला सर्वात वेगवान प्रतितास 153.3 किमी वेगाने चेंडू टाकला. गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात उमरानने हा बॉल टाकला. गुजरातच्या डावात 15 व्या षटकात उमरानने इतक्या वेगाने गोलंदाजी केली.
“उमरान मलिक लवकरच भारतासाठी खेळेल. मी BCCI मध्ये असतो, तर त्याची वेगवान गोलंदाजी विकसित करण्यासाठी त्याला काऊंटी क्रिकेट खेळायला पाठवलं असतं” असं इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन टि्वटरवर म्हणाला. यापूर्वी आयपीएल 2021 मध्ये उमरान मलिकने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध ताशी 153.1 किमी वेगाने चेंडू टाकला होता. गुजरात टायटन्स विरुद्ध काल उमरानने चार षटकात 39 धावा देऊन एक विकेट काढला.
काल सातव्या षटकात हार्दिकचा सामना वेगवान गोलंदाज उमरान मलिक बरोबर झाला. उमरान त्याचं पहिलच षटक टाकत होता. या ओव्हरची सुरुवात ज्या पद्धतीने झाली, त्याची कल्पना हार्दिकनेही केली नसेल.
Umran Malik will play for India very soon … If I was the @BCCI I would be sending him to play some County cricket this summer to help him develop first though … #IPL2022
— Michael Vaughan (@MichaelVaughan) April 11, 2022
उमरानने पहिलाच चेंडू शॉर्ट टाकला. या बॉलवर पुल शॉट खेळण्याचा हार्दिकचा प्रयत्न फसला. चेंडू थेट हेल्मेटच्या ग्रीलवर आदळला. या चेंडूने हार्दिकला चकवलं आणि एका लढतीची सुरुवात झाली. बॉल लागल्यानंतर हार्दिकने स्वत:ला सावरलं व लगेच फलंदाजी सुरु केली. त्याने उमरानला बॅटनेच जोरदार प्रत्युत्तर दिलं.