मुंबई: लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) आयपीएल 2022 मध्ये दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. सोमवारी झालेल्या सामन्याल लखनौने सनरायजर्स हैदराबादवर 12 धावांनी विजय मिळवला. टीमच्या विजयात कॅप्टन केएल राहुलने (KL Rahul) महत्त्वपूर्ण योगदान दिलं. फलंदाजी बरोबर त्याने आपल्या क्षेत्ररक्षणानेही प्रभावित केलं. केएल राहुलने एडन मार्करामचा (Aiden Markram) शानदार झेल घेतला. ही कॅच सामन्याचा एक टर्निग पॉईंट ठरला. कृणाल पंड्याच्या 11 व्या षटकात पहिल्या चेंडूवर एडन मार्करामला इनसाइड आऊट शॉट खेळायचा होता. पण फटक्याचा टायमिंग चुकला. चेंडू कव्हर रीजनच्या दिशेने गेला. तिथे केएल राहुलने उडी मारुन मार्करामचा अप्रतिम झेल घेतला. फलंदाजी करताना राहुलने 50 चेंडूत 68 धावा केल्या. यात सहा चौकार आणि एक षटकार होता. राहुलने या दरम्यान दीपक हुड्डासोबत चौथ्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे लखनौच्या टीमने एक मोठी धावसंख्या उभारली.
टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना लखनौच्या टीमने निर्धारीत 20 षटकात सात विकेट गमावून 169 धावा केल्या. कॅप्टन केएल राहुलने सर्वाधिक 68 आणि दीपक हुड्डाने 51 रन्स केल्या. सनरायजर्सकडून नटराजन, वॉशिंग्टन सुंदर आणि रोमारियो शेफर्डने प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या. लखनौने विजयासाठी 170 धावाचे लक्ष्य दिले होते. SRH ने निर्धारीत 20 षटकात नऊ बाद 157 धावा केल्या. लखनौ सुपर जायंट्सने सनरायजर्स हैदराबादवर 12 धावांनी विजय मिळवला. जेसन होल्डरने शेवटच्या षटकात अप्रतिम गोलंदाजी केली. लखनौकडून आवेश खानने सर्वाधिक चार, जेसन होल्डरने तीन आणि कृणाल पंड्याने दोन विकेट घेतल्या.
केकेआरनं दुसरं स्थान शाबूत ठेवलं आहे. त्यानंतर येतो गुजरातचा संघ. या संघाने दोन्हीही सामन्यात यश मिळवलंय. त्यामुळे तो तिसऱ्या स्थानी आहे. तर पंजाब चौथ्या आणि आता पाचव्या स्थानी लखनौचा संघ आलाय.