IPL 2022: नरिमन पॉईंट ते अंधेरी, मुंबईच्या कुठल्या हॉटेलमध्ये IPLची कुठली टीम उतरणार, काय सुविधा मिळणार?
IPL 2022: बहुचर्चित इंडियन प्रिमीयर लीगच्या सीजनची सुरुवात 26 मार्चपासून होत आहे. 29 मे रोजी फायनल होणार आहे. कोरोनामुळे ग्रुप स्टेजचे सर्व सामने मुंबई आणि पुण्यात खेळले जाणार आहेत.
1 / 12
बहुचर्चित इंडियन प्रिमीयर लीगच्या सीजनची सुरुवात 26 मार्चपासून होत आहे. 29 मे रोजी फायनल होणार आहे. कोरोनामुळे ग्रुप स्टेजचे सर्व सामने मुंबई आणि पुण्यात खेळले जाणार आहेत. मुंबईत ब्रेबॉन, डीवाय पाटील आणि वानखेडे या तीन स्टेडियम्सवर सामने होणार आहेत. पुण्याच्या MCA स्टेडियममध्ये 15 सामने होणार आहेत.
2 / 12
यंदा आयपीएलमध्ये एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. गुजरात टायटन्स, लखनौ सुपर जायंट्स प्रथमच खेळणार आहेत. चेन्नइ सुपर किंग्स (CSK), कोलकाता नाइट रायडर्स (KKR), मुंबई इंडियन्स (MI), राजस्थान रॉयल्स (RR), रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB), पंजाब किंग्स (KXIP), दिल्ली कॅपिटल्स, (DC) सनरायजर्स हैदराबाद (SRH) हे जुने संघ आहेत.
3 / 12
कोलकाता नाइट रायडर्सचा संघ परेलच्या ITC ग्रँड सेंट्रल हॉटेलमध्ये उतरणार आहे. या हॉटेलमध्ये स्पा, फिटनेस सेंटर, इंडोर पूल सारख्या अनेक सुविधा उपलब्ध आहेत.
4 / 12
मुंबई इंडियन्सचा संघ Trident BKC मध्ये उतरणार आहे. मुंबईतील बिझनेसचे मुख्य केंद्र असलेल्या वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्समध्ये हे हॉटेल आहे. स्पा आणि फिटनेस सेंटर सारख्या सुविधा या हॉटेलमध्ये आहेत. खेळाडूंना त्यांचा थकवा दूर करण्यासाठी या सेंटर्सची मदत होईल.
5 / 12
पंजाब किंग्सचा संघ मुंबईतील पवईमधील Renaissance Hotel मध्ये उतरेल. मुंबई एअरपोर्टपासून हे हॉटेल 4.3 किमी अंतरावर आहे. या हॉटेलमध्ये स्पा, पूल आणि फिटनेस सेंटर आहे.
6 / 12
अंधेरी पूर्वेला असलेल्या ITC Maratha हॉटेलमध्ये सनरायजर्स हैदराबादचा संघ उतरणार आहे. मुंबई विमानतळापासून अवघ्या एक किमीच्या अंतरावर हे हॉटेल आहे. मसाज चेयर आणि बटलर या हॉटेलच्या बेस्ट सर्विस मानल्या जातात.
7 / 12
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची टीम वांद्रयाच्या Taj Lands End हॉटेलमध्ये उतरणार आहे. या हॉटेलला मुंबईची राणी (Queen of Suburbs) म्हणून ओळखलं जातं. हे हॉटेल समुद्रापासून फक्त 200 मीटर अंतरावर आहे. या हॉटेलमधून अरबी समुद्र तसंच वांद्रे-वरळी सी लिंक दिसतो.
8 / 12
चेन्नई सुपर किंग्सची टीम नरीमन पॉईंटच्या Trident Hotel मध्ये उतरणार आहे. या 35 मजली हॉटेलमधून समुद्राचा शानदार नजारा दिसतो. वानखेडेपासून फक्त तीन किमी अंतरावर हे हॉटेल आहे. Trident जुन्या फायव्ह स्टार हॉटेल्सपैकी एक आहे.
9 / 12
राजस्थान रॉयल्सची टीम सांताक्रूझच्या Grand Hyatt हॉटेलमध्ये वास्तव्य करणार आहे. मुंबई विमानतळ आणि BKC पासून हे हॉटेल जवळ आहे.
10 / 12
दिल्ली कॅपिटल्सची टीम प्रसिद्ध Taj Palace हॉटेलमध्ये थांबली आहे. कुलाब्यात हे हॉटेल आहे. गेट वे ऑफ इंडियापासून हे हॉटेल जवळ आहे. वानखेडे स्टेडियम या हॉटेलपासून 20 ते 25 मिनिटांच्या अंतरावर आहे.
11 / 12
लखनौ सुपर जायंट्सचा संघ Taj Vivanta हॉटेलमध्ये उतरणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालयापासून हे हॉटेल फक्त दोन किमी अंतरावर आहे. सर्व हॉटेल्सप्रमाणे या हॉटेलातही स्वीमिंग पूल, फिटनेस सेंटर आणि स्पा सारख्या सुविधा आहेत.
12 / 12
IPLचा दुसरा संघ गुजरात टायटन्स JW Marriott हॉटेलमध्ये उतरला आहे. मुंबईच्या अंधेरी भागात हे हॉटेल आहे.