KKR vs GT IPL 2022: Tim Southee ची एक चूक KKR ला खूप महाग पडू शकते, पहा VIDEO

| Updated on: Apr 23, 2022 | 5:40 PM

KKR vs GT IPL 2022: टिम साउदीने आजच्या सामन्यात दुसऱ्याओव्हरमध्ये चूक केली. टिम साउदी त्याचं पहिलं षटक टाकत होता. साउदीने पहिल्या चेंडूवर शुभमन गिलची मोठी विकेट मिळवली.

KKR vs GT IPL 2022: Tim Southee ची एक चूक KKR ला खूप महाग पडू शकते, पहा VIDEO
KKR vs GT
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई: नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर कोलकाता नाइट रायडर्स आणि गुजरात टायटन्समध्ये (KKR vs GT) सामना सुरु आहे. या सामन्यादरम्यान केकेआरचा वेगवान गोलंदाज टिम साउदीकडून (Tim Southee) एक चूक झाली. ज्याची मोठी किंमत केकेआरला चुकवावी लागू शकते. कदाचित त्यामुळे केकेआरला सामना गमवावा लागू शकतो. साउदीकडून झालेल्या चुकीमुळे गुजरात टायटन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्या (Hardik pandya) स्वत:ला सेट करण्याची संधी मिळाली व त्याने संघाचा डाव सावरला. हार्दिक पंड्या सारख्या खेळाडूला मिळालेलं एका छोटसं जीवदानही प्रतिस्पर्धी संघाच्या पराभवासाठी पुरेस ठरतं. हार्दिकला आज संधी मिळाल्यानंतर त्याने त्या संधीचं सोनं केलं. हार्दिक पंड्या खेळपट्टीवर टिकल्यानतंर त्याने धावाही केल्या. त्याशिवाय सहकाऱ्यांमा मुक्तपणे फटकेबाजी करण्याची संधीही दिली.

अखेरीस एक मोठी चूकही केली

टिम साउदीने आजच्या सामन्यात दुसऱ्याओव्हरमध्ये चूक केली. टिम साउदी त्याचं पहिलं षटक टाकत होता. साउदीने पहिल्या चेंडूवर शुभमन गिलची मोठी विकेट मिळवली. पण अखेरीस एक मोठी चूकही केली. हार्दिक पंड्या तिसऱ्याक्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. त्याला रनआऊट करण्याची सोपी संधी साउदीने दवडली. त्यावेळी हार्दिकने चार चेंडूत फक्त 10 धावांवर खेळत होता.

टिम साउदीची मोठी चूक, VIDEO पहण्यासाठी इथे क्लिक करा

कॅप्टन इनिंग्स खेळला

हार्दिक पंड्याने मिळालेल्या जीवदानाचा पुरेपूर फायदा उचलला. हार्दिकने या सामन्यात कॅप्टन इनिंग्स खेळला. त्याने यंदाच्या सीजनमध्ये तिसरं अर्धशतक झळकावलं. त्याशिवाय दुसऱ्या आणि तिसऱ्या विकेटसाठी चांगली भागीदारी केली. हार्दिकने 49 चेंडूत 67 धावा केल्या. यात चार षटकार आणि दोन चौकार होते.