Umesh yadav vs PBKS: उमेशची पहिल्या ओव्हरमध्ये विकेट घेण्याची हॅट्ट्रिक, पंजाब किंग्सची वाट लावली

| Updated on: Apr 01, 2022 | 9:57 PM

Umesh yadav vs PBKS: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा (IPL 2022) फक्त युवा, उदयोन्मुख खेळाडूंसाठीच नाही, तर अनुभवी आणि सिनियर खेळाडूंसाठी देखील तितकीच महत्त्वाची आहे.

Umesh yadav vs PBKS: उमेशची पहिल्या ओव्हरमध्ये विकेट घेण्याची हॅट्ट्रिक, पंजाब किंग्सची वाट लावली
KKR उमेश यादव
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा (IPL 2022) फक्त युवा, उदयोन्मुख खेळाडूंसाठीच नाही, तर अनुभवी आणि सिनियर खेळाडूंसाठी देखील तितकीच महत्त्वाची आहे. भारताच्या राष्ट्रीय संघात स्थान न मिळवू शकलेल्या सिनियर खेळाडूंना इथे आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळते. भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव (Umesh Yadav) याचं उत्तम उदहारण आहे. ज्याने आयपीएल 2022 च्या पहिल्या तीन सामन्यात आपल्या टिकाकारांना चुकीच सिद्ध केलं आहे. उमेश यादवला जे टी 20 क्रिकेटसाठी योग्य समजत नव्हते, त्यांना उमेशने आपल्या परफॉर्मन्समधून उत्तर दिलं आहे. मागच्या सीजनमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) भाग असलेल्या उमेश यादवला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. या सीजनमध्ये उमेश त्या टीमकडून खेळतोय, जिथे त्याला सर्वात जास्त यश मिळालं. कोलकाता नाइट रायडर्समध्ये परतल्यानंतर उमेशची गोलंदाजी पहिल्यासारखी धारदार झाली आहे.

मयंक अग्रवालची विकेट

वानखेडे स्टेडियमवर केकेआर आणि पंजाब किंग्समध्ये सामना सुरु आहे. केकेआरने पहिली गोलंदाजी केली. उमेश यादवने या सामन्यात भेदक मारा केला. त्याने पहिल्याच षटकात पंजाब किंग्सचा कॅप्टन मयंक अग्रवालला तंबूत पाठवलं. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर उमेशने एक सुंदर इन कटरवर मयंकला पायचीत पकडलं. चेंडू इतका अचूक होता की, मयंकने रिव्यू सुद्धा घेतला नाही. उमेश यादवने या सामन्यात लियाम लिविंगस्टोन, हरप्रीत ब्ररार, राहुल चाहर यांच्या विकेट घेतल्या. त्याने चार षटकात 23 धावा देत चार विकेट घेतल्या.

पहिल्याच ओव्हरमध्ये घेतो विकेट

उमेश यादव या सीजनला सुरुवात झाल्यापासून पहिल्या ओव्हरमध्ये विकेट घेत आहे. आजच्या सामन्यातही त्याने तोच सिलसिला कायम ठेवला. पहिल्याच षटकात त्याने कॅप्टन मयंक अग्रवालला तंबूत पाठवलं. पहिल्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात त्याने ऋतुराज गायकवाडला तंबूत पाठवलं होतं. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्धच्या सामन्यात त्याने अनुज रावतला तंबूत पाठवलं होतं. आता पंजाब विरुद्ध त्याने अशीच कामगिरी केली आहे.