IPL 2022: मेगा ऑक्शनमध्ये कुठल्या संघाला किती कोटी खर्च करता येणार, ते आर्थिक गणित समजून घ्या…

| Updated on: Feb 01, 2022 | 4:20 PM

महेंद्रसिंह धोनी त्यासाठीच चेन्नईमध्ये गेला होता. आपल्याला कुठला खेळाडू हवा, कुठला नको याचं प्रत्येक संघाचं गणित ठरलेलं आहे. नियमानुसार प्रत्येक फ्रेंचायजीला चार खेळाडू रिटेन करता आले.

IPL 2022: मेगा ऑक्शनमध्ये कुठल्या संघाला किती कोटी खर्च करता येणार, ते आर्थिक गणित समजून घ्या...
चेन्नई सुपर किंग्ज
Follow us on

मुंबई: इंडियन प्रिमियर लीगच्या (Indian Premier League) यंदाच्या हंगामात एकूण किती क्रिकेटपटुंवर बोली लागणार (Mega Auction) त्याची यादी BCCI ने प्रसिद्ध केली आहे. एकूण 590 क्रिकेटपटू यंदाच्या लिलावात असणार आहेत. दहा संघांमध्ये त्यांना खरेदी करण्यासाठी चुरस असेल. येत्या 12 आणि 13 फेब्रुवारीला मेगा ऑक्शन पार पडणार आहे. त्यासाठी सर्व संघांनी आपली रणनिती तयार करुन ठेवली आहे. महेंद्रसिंह धोनी त्यासाठीच चेन्नईमध्ये गेला होता. आपल्याला कुठला खेळाडू हवा, कुठला नको याचं प्रत्येक संघाचं गणित ठरलेलं आहे. नियमानुसार प्रत्येक फ्रेंचायजीला चार खेळाडू रिटेन करता आले. त्यामुळे अनेक युवा टॅलेंटेड खेळाडूंना संघात घेण्याची फ्रेंचायजींना संधी असेल. योग्य संतुलित संघ कसा बांधता येईल? वेगवान, फिरकी गोलंदाज, ऑलराऊंडर, फिल्डर्स, फलंदाज असं प्रत्येक संघाच गणित ठरलेलं आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे आयपीएलमधले दोन बलाढ्य संघ आहेत. मुंबई इंडियन्सने पाचवेळा तर चेन्नईने चार वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावलं आहे.

असं आहे आर्थिक गणित
आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठी खेळाडू विकत घेताना प्रत्येक संघाला पैशांचं गणितही संभाळाव लागणार आहे. कारण आधीच रिटेन केलेल्या खेळाडूंवर जितकी रक्कम खर्च केलीय, त्यातून उरलेली रक्कम लिलावात वापरावी लागणार आहे. प्रत्येक संघाचं आर्थिक गणित कसं आहे, ते समजून घेऊया.

कुठल्या संघाकडे किती रक्कम शिल्लक

धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जकडे 48 कोटी रुपये असून ते 21 खेळाडूंना संघात घेऊ शकतात. यात सात परदेशी खेळाडू असतील.

दिल्ली कॅपिटल्सकडे 47.5 कोटी रुपयांचं बजेट आहे. त्यांना देखील चेन्नई इतकेच खेळाडू आपल्या कोट्यात ठेवता येतील.

कोलकाता नाइट रायडर्सकडे 48 कोटी रुपये आहेत. ते सुद्धा 21 खेळाडू विकत घेऊ शकतात. यात सहा परदेशी खेळाडू आहेत.

लखनऊ सुपर जायंटसकडे 59 कोटी रुपये आहेत. ते 22 खेळाडू विकत घेऊ शकतात. यात सात परदेशी खेळाडू असतील.

मुंबई इंडियन्सकडे 48 कोटी रुपये शिल्लक आहेत. ते सुद्धा सात परदेशी खेळाडूंसह 21 खेळाडू विकत घेऊ शकतात.

किंग्ज इलेव्हन पंजाबकडे सर्वात जास्त 72 कोटी रुपये आहेत. ते आठ परदेशी खेळाडुंसह 23 क्रिकेटपटू विकत घेऊ शकतात.

राजस्थानकडे 62 कोटींचं बजेट आहे. ते 22 खेळाडू विकत घेऊ शकतात.

आरसीबी म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडे 57 कोटींचे बजेट आहे. ते सात परदेशी खेळाडुंसह 22 खेळाडू विकत घेऊ शकतात.