IPL 2022: कोलकाता नाइट रायडर्सचे 16 कोटी रुपये पाण्यात, फ्रेंचायजीसमोर मोठं संकट

| Updated on: May 03, 2022 | 5:04 PM

IPL 2022: कोलकाता नाइट रायडर्सने काल राजस्थान रॉयल्स (Rajasthan Roylas) विरुद्धचा सामना (KKR vs RR) जिंकला. पण यंदाचा सीजन कोलकातासाठी (Kolkata) जास्त उत्साहवर्धक नाहीय.

IPL 2022: कोलकाता नाइट रायडर्सचे 16 कोटी रुपये पाण्यात, फ्रेंचायजीसमोर मोठं संकट
KKR
Image Credit source: IPL
Follow us on

मुंबई: कोलकाता नाइट रायडर्सने काल राजस्थान रॉयल्स (Rajasthan Roylas) विरुद्धचा सामना (KKR vs RR) जिंकला. पण यंदाचा सीजन कोलकातासाठी (Kolkata) जास्त उत्साहवर्धक नाहीय. सलग पाच पराभवानंतर काल केकेआरने मॅच जिंकली. कोलकाता नाइट रायडर्सने कालच्या सामन्यात दोन मोठे बदल केले. विजय मिळवण्यासाठी कोलकाता टीमने हे बदल केले, हे खरं आहे. पण त्यामुळे त्यांचे 16 कोटी रुपये पाण्यात गेले, असंच बोलावा लागेल. केकेआरसाठी हे एकप्रकारचं संकटच आहे. तुम्ही म्हणाल, कालचा सामना कोलकाताने जिंकला, मग 16 कोटी रुपये पाण्यात कसे गेले? त्याचं आहे असं की, केकेआरवर तब्बल 16 कोटी रुपये मोजून विकत घेतलेल्या महागड्या खेळाडूंना बाहेर बसवण्याची वेळ आली आहे.

इतकी कोट्यवधी रक्कम खर्च करण्याचा काय फायदा?

राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या कालच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने दोन बदल केले. त्यांनी वेंकटेश अय्यरला बाहेर बसवलं. वेंकटेश अय्यरला केकेआरने ऑक्शनमध्ये विकत घेतलं नव्हत, तर रिटेन केलं होतं. केकेआरने 8 कोटी रुपये मोजून वेंकटेशला रिटेन केलं होतं. आता त्याला बाहेर बसवाव लागत असेल, तर इतकी कोट्यवधी रुपयाची रक्कम खर्च करण्याचा काय फायदा आहे?

तर पैसे पाण्यात गेले असंच म्हणणार ना

फक्त वेंकटेश अय्यरच नाही, तर वरुण चक्रवर्तीलाही बाहेर बसवलं. मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती मागच्या सामन्यापासून बाहेर आहे. केकेआरने वरुणला सुद्धा मेगा ऑक्शनमध्ये विकत घेतलं नाही. फक्त 8 कोटी रुपयांमध्ये रिटेन केलं होतं. रिटेने केलेले प्लेयर खेळतच नसतील, तर पैसे पाण्यात गेले असंच म्हणणार ना. एवढा पैसा खर्च केलेले खेळाडू संघात नाहीत, विजयाची खात्री नाही, त्यामुळे केकेआरच्या अडचणीत अधिकच भर पडली आहे.