IPL 2022: MI vs DC सामना पाहण्यासाठी विराट वानखेडेवर जाणार?, फाफने दिल्या मुंबई, मुंबईच्या घोषणा, पहा VIDEO

| Updated on: May 20, 2022 | 7:02 PM

प्लेऑफच्या शर्यतीत टिकून रहाण्यासाठी RCB ला गुजरात टायटन्सवर विजय मिळवणं आवश्यक होतं. जो विजय त्यांनी गुरुवारी मिळवला. कालच्या सामन्यात बँगलोरकडून विराट कोहलीने 73 धावांची खेळी केली.

IPL 2022: MI vs DC सामना पाहण्यासाठी विराट वानखेडेवर जाणार?, फाफने दिल्या मुंबई, मुंबईच्या घोषणा, पहा VIDEO
Virat kohli-Faf du plesis
Image Credit source: IPL
Follow us on

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) 15 वा सीजन सुरु आहे. शनिवारी वानखेडे स्टेडियमवर Mumbai Indians विरुद्ध Delhi Capitals मध्ये सामना होणार आहे. उद्या होणाऱ्या या सामन्यावर सर्वात जास्त लक्ष रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि त्यांच्या फॅन्सचं असेल. बँगलोरचे समर्थक उद्या फक्त दिल्ली आणि मुंबईचा सामनाच पाहणार नाहीत, तर मुंबईच्या विजयाची प्रार्थना करतील. कारण मुंबई जिंकली, तरच रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची टीम प्लेऑफसाठी पात्र ठरेल. दिल्लीचा संघ जिंकला, तर RCB चं आयपीएलमधील आव्हान संपुष्टात येईल. कारण दिल्लीचा रनरेट RCB पेक्षा जास्त चांगला आहे. बँगलोरच्या टीममधील दोन दिग्गजांनी खुलेआम मुंबईचं समर्थन केलं आहे. हे दोन खेळाडू आहेत, विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस. दिल्ली विरुद्ध होणाऱ्या सामन्याच्यावेळी हे दोन खेळाडू मुंबईसाठी चिअर करताना दिसतील.
प्लेऑफच्या शर्यतीत टिकून रहाण्यासाठी RCB ला गुजरात टायटन्सवर विजय मिळवणं आवश्यक होतं. जो विजय त्यांनी गुरुवारी मिळवला. कालच्या सामन्यात बँगलोरकडून विराट कोहलीने 73 धावांची खेळी केली. बँगलोरचे पॉइंट्स टेबलमध्ये 16 गुण झाले आहेत. दिल्लीचे 14 अंक आहेत. ऋषभच्या दिल्लीने मुंबईवर विजय मिळवला, तर त्यांचे 16 पॉइंटस होतील.

तुम्ही आम्हाला स्टेडियममध्येही पाहू शकता

गुजरात विरुद्धच्या सामन्यानंतर विराट आणि फाफ बरोबर चर्चा केली. तो व्हिडिओ आयपीएलच्या अधिकृत वेबसाइट आणि टि्वटरवर हँडलवर अपलोड केला. विराट कॅमेऱ्यासमोर बोलताना म्हणाला की, “संघाच्या विजयात योगदान दिल्याचा मला आनंद आहे. फाफचं योगदानही महत्त्वाचं आहे. आता आम्ही दोन दिवस आराम करणार आणि मुंबईचं समर्थन करणार. मुंबईसाठी आमच्याकडे फक्त दोन नाही 25 समर्थक आहेत. तुम्ही आम्हाला स्टेडियममध्येही पाहू शकता. या दरम्यान फाफने मुंबई, मुंबईच्याही घोषणा दिल्या”

फाफची इच्छा, रोहितला त्याचा फॉर्म परत मिळूं दे

दिल्ली विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा फॉर्म मध्ये येईल, त्याला सूर गवसेल अशी अपेक्षा फाफ डू प्लेसिसने व्यक्त केली. “एखाद-दोन सामन्यातील खराब कामगिरीमुळे आम्ही आज या स्थितीमध्ये आहोत. तुम्हाला आमच्या ड्रेसिंग रुममध्ये निळ्या टोप्या दिसू शकतात. रोहित मोठी इनिंग खेळेल अशी अपेक्षा आहे” असं फाफ डू प्लेसिस म्हणाला.