मुंबई: आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्समध्ये (RR vs GT) सामना सुरु आहे. दोन्ही संघांमधील हा पहिलाच सामना आहे. दोन्ही संघ टॉप फॉर्ममध्ये आहेत. हार्दिक आणि संजूच्या टीमने प्रत्येकी तीन सामने जिंकेल आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक मॅच गमावली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यातील विजेता संघ गुणतालिकेत टॉपवर पोहोचेल. गुजरातने आजच्या सामन्यासाठी संघात एकमेव बदल केला आहे. त्याच्याबद्दल फॅन्सना जास्त माहित नाहीय. डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयाल (Yash dayal) गुजरात टायटन्सकडून आज डेब्यु केला. गुजरातचे गोलंदाजी प्रशिक्षक आशिष नेहरा यांनी यश डेब्यु करताना गुजरात टायटन्सची कॅप दिली. यश दयालला आपली प्रतिभा दाखवण्यासाठी एक मोठा मंच मिळाला आहे.
यश दयाल उत्तर प्रदेशकडून फर्स्ट क्लास क्रिकेट खेळतो. यशने 14 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये 50 विकेट मिळवल्या आहेत. लिस्ट ए मध्ये त्याच्या नावावर 23 आणि टी 20 मध्ये 15 विकेट आहेत.
2️⃣ changes for us tonight ??
Yash Dayal ? Darshan Nalkande
Vijay Shankar ? Sai Sudharsan#SeasonOfFirsts #AavaDe #RRvGT pic.twitter.com/M8b3dkCt2W— Gujarat Titans (@gujarat_titans) April 14, 2022
विजय हजारे ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी करुन यशने फ्रेंचायजीचं लक्ष वेधून घेतलं होतं. यूपीच्या या गोलंदाजाने सात सामन्यात 14 विकेट घेतल्या. तो टॉप पाच गोलंदाजांमध्ये होता. यश दयाल मागच्या तीन वर्षांपासून आयपीएलमध्ये खेळण्यासाठी ट्रायल देत होता. मुंबई इंडियन्सनेही या वेगवान गोलंदाजाला रिजेक्ट केलं. पण आयपीएल 2022 मध्ये यशला त्याच्या मेहनतीच फळ मिळालं. गुजरात टायटन्सने 3.20 कोटी रुपयांची बोली लावून या वेगवान गोलंदाजाला विकत घेतलं.