लखनौ : टीम इंडियाचा क्रिकेटपटू विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात काल रात्री लखनौच्या मैदानात राडा झाला. सामना संपल्यानंतर दोघांमध्ये चांगलीच हमरी-तुमरी झाली. या भांडणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. क्रिकेटच्या मैदानात अशा प्रकारे वादावादी करणं विराट कोहली आणि गौतम गंभीर दोघांना चांगलच महागात पडलं आहे. दोघांमधील शाब्दीक वादावादीच पर्यावसन भले हाणामारीत झालं नाही, पण क्रिकेटच्या मैदानातील ही घटना लाजिरवाणी आहे.
हे सरळ-सरळ क्रिकेटच्या नियमांच्या विरोधात असून विराट कोहली आणि गौतम गंभीर दोघांना त्याची शिक्षा मिळाली आहे. आयपीएलच्या 16 व्या सीजनचा आता दुसरा टप्पा चालू असून इथे पराभव कुठल्याही टीमला परवडणारा नाहीय.
काय सुनावली शिक्षा?
कोहली आणि गंभीर दोघेही IPL च्या आचार संहिता उल्लंघनात दोषी ठरले आहेत. याची शिक्षा म्हणून त्यांची मॅच फी कापण्यात आली आहे. दोघांना लखनौमधील सामन्याची मॅच फी मिळणार नाही. शिक्षा म्हणून त्यांची 100 टक्के मॅच फी कापण्यात आली. विराट RCB च प्रतिनिधीत्व करतो. गौतम गंभीर लखनौ टीमचा मार्गदर्शक आहे.
भांडणामुळे टोटल नुकसान
चालू सीजनमधील विराट कोहलीला मिळालेली ही तिसरी शिक्षा आहे. मागच्या दोन चुकांपेक्षा त्याने ही तिसरी मोठी चूक केली. IPL 2023 मध्ये याआधी दोनवेळा स्लो ओव्हर रेटबद्दल त्याला दंड ठोठावण्यात आला होता. त्यावेळी तो फाफ डु प्लेसीच्या जागी RCB च नेतृत्व करत होता. पण यावेळी भांडणासाठी कोहलीला शिक्षा झाली असून ही मोठी शिक्षा आहे.
No of wickets taken by Naveen ul haq across all formats- 54
No of centuries Virat Kohli has across all format- 80@imnaveenulhaq tujhe kis baat ka ghamand hai bhai? ? pic.twitter.com/RTnxl5F9ui
— BALA (@erbmjha) May 1, 2023
कोहली-गंभीरसोबत आणखी एका खेळाडूला शिक्षा
विराट कोहली आणि गौतम गंभीर दोघे IPL आचार संहितेच उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळले आहेत. लेव्हल 2 अंतर्गत ते दोषी आहेत. दोघांनी आपली चूक मान्य केली, त्यानंतर त्यांची पूर्ण 100 टक्के मॅच फी कापण्यात आली. या दोघांशिवाय लखनौ सुपर जायंट्सचा गोलंदाज नवीन-उल-हकला सुद्धा शिक्षा झाली. त्याच्या मॅच फी मधून 50 टक्के रक्कम कापण्यात येईल. नवीनने कोहलीशी पंगा घेतला ही त्याची चूक आहे.
What happened? ?? pic.twitter.com/cmi0dWvsLt
— ✨ (@Kourageous7) May 1, 2023
विराट-गंभीर कधी भिडले?
कोहली आणि गंभीरमधील भांडण लखनौ आणि बँगलोरची मॅच संपल्यानंतर सुरु झालं. दोन्ही टीम्सचे खेळाडू परस्परांना हस्तांदोलन करत होते, त्यावेळी वाद सुरु झाला. त्याचवेळी विराट आणि कोहलीमध्ये भांडण झालं. वाद वाढत असल्यामुळे अन्य खेळाडूंना मध्यस्थी करावी लागली.